विभागात दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात शिष्यवृत्तीपासून वंचित - जोड
By Admin | Updated: February 11, 2015 00:33 IST2015-02-11T00:33:38+5:302015-02-11T00:33:38+5:30
::::चौकट:::

विभागात दोन लाखांवर विद्यार्थी राहू शकतात शिष्यवृत्तीपासून वंचित - जोड
:::: चौकट:::समाजकल्याण विभागाचा महाविद्यालयांना इशारा वेळेवर अर्ज आल्यास त्याची स्क्रूटीनी करणे कठीण जाईल व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळू शकणार नाही. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज कार्यालयाला वेळेच्या आत मिळावे म्हणून विभागाच्या वतीने महाविद्यालयाच्या बैठका घेण्यात येत आहे. बैठकांमध्ये महाविद्यालयाला कारवाईचा इशाराही देण्यात येत आहे. असे असतानाही महाविद्यालयाकडून गांभीर्याने घेतले जात नाही. शिष्यवृत्तीच्या प्रक्रियेत राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागानेही पुढाकार घेणे गरजेचे आहे. महाविद्यालय उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारित येत असल्याने विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळावी म्हणून महाविद्यालयांना निर्देश देणे गरजेचे आहे, अन्यथा लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहतील. आर.डी. आत्राम, विभागीय समाजकल्याण अधिकारी