सुप्रीम कॉलनीत केटर्सच्या दुकानाला आग दोन लाखाचे नुकसान : किराणा साहित्य व फ्रिज, खुर्च्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2016 00:42 IST2016-04-15T00:42:49+5:302016-04-15T00:42:49+5:30

जळगाव: सुप्रीम कॉलनीत मच्छी मार्केटजवळ असलेल्या केटर्सच्या दुकानाला गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात एक लाख रुपये किमतीचा किराणा सामान, फ्रिज, खुर्च्या, भांडी, टेबल व अन्य साहित्य जळून खाक झाले. यात दोन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालक सीताराम शंकर चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी) यांनी व्यक्त केला आहे.

Two lacs of fire in Supreme Colony city's shops: groceries and fridges, chairs of chairs | सुप्रीम कॉलनीत केटर्सच्या दुकानाला आग दोन लाखाचे नुकसान : किराणा साहित्य व फ्रिज, खुर्च्या खाक

सुप्रीम कॉलनीत केटर्सच्या दुकानाला आग दोन लाखाचे नुकसान : किराणा साहित्य व फ्रिज, खुर्च्या खाक

गाव: सुप्रीम कॉलनीत मच्छी मार्केटजवळ असलेल्या केटर्सच्या दुकानाला गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. त्यात एक लाख रुपये किमतीचा किराणा सामान, फ्रिज, खुर्च्या, भांडी, टेबल व अन्य साहित्य जळून खाक झाले. यात दोन लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज दुकानमालक सीताराम शंकर चव्हाण (रा.सुप्रीम कॉलनी) यांनी व्यक्त केला आहे.
मच्छी मार्केटला लागूनच चव्हाण यांचे दुकान आहे. रात्री दोन वाजेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. यामुळे पळापळ झाली. शेजारच्या लोकांनी मिळेल तेथून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही जणांनी ही माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यांनीही लागलीच अग्निशमन दलाला फोन करुन तातडीन अग्निशमनबंब मागविले. अर्धा तास आगीचे तांडव सुरु होते. एक बंब व नागरिकांनी आणलेल्या पाण्याद्वारे आग आटोक्यात आणली. आगीचे कारण समजू शकले नाही, याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Two lacs of fire in Supreme Colony city's shops: groceries and fridges, chairs of chairs