सातार्‍यात जमावाच्या हल्ल्यात दोन ठार बुधमध्ये तणाव : चार जखमी, दोन संशयित ताब्यात

By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:27+5:302015-08-16T23:44:27+5:30

बुध/पुसेगाव (सातारा) : खटाव तालुक्यातील बुध गावातील रामोशी वस्तीवर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पन्नास जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Two killed in police attack in Satara, Tension due to Wed: Four injured, two suspects arrested | सातार्‍यात जमावाच्या हल्ल्यात दोन ठार बुधमध्ये तणाव : चार जखमी, दोन संशयित ताब्यात

सातार्‍यात जमावाच्या हल्ल्यात दोन ठार बुधमध्ये तणाव : चार जखमी, दोन संशयित ताब्यात

ध/पुसेगाव (सातारा) : खटाव तालुक्यातील बुध गावातील रामोशी वस्तीवर शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पन्नास जणांच्या जमावाने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
हल्ल्यात चार जण जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. दिलीप मल्हारी जाधव (२७) व शामराव कोंडिबा जाधव (२६, दोघे रा. करंजओढा, बुध) अशी मृतांची नावे आहेत. हल्ल्यातील जखमींवर सातारा येथील शासकीय व खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेमुळे बुध परिसरात तणाव असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. सर्व हल्लेखोरांना अटक होईपर्यंत शामराव यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणावात भर पडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शामराव जाधव व संदीप जाधव दोघे शेतातील बटाटा पिकाला भर घालून घरी परतत असताना जमावाने तलवार, कुर्‍हाड, लोखंडी पाईप, हॉकी स्टिक, काठ्या आदींचा वापर करत त्यांच्यावर हल्ला केला. दोघांना मारहाण झाल्याची माहिती मिळताच कोंडिबा जाधव घटनास्थळी पोहोचले, त्यांनाही जबर मारहाण झाली. त्यानंतर इतर जण त्यांच्या बचावासाठी आले असताना जमावाने त्यांनाही मारहाण केली. (वार्ताहर)
---------------------
तब्बल दीड तासाने मदतकार्य
गंभीर जखमी झालेले तरुण रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत बराच वेळ घटनास्थळी पडून होते. हल्ल्यानंतर तातडीने पुसेगाव पोलिसांना कळविण्यात आले होते. मात्र घटनास्थळी प्रारंभी एकच पोलीस आला. अपुर्‍या पोलीस यंत्रणेमुळे हल्लेखोरांवर नियंत्रण मिळविता आले नाही. तब्बल दीड तासानंतर पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. नंतर मदतकार्य सुरू झाले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले.
---------------------

Web Title: Two killed in police attack in Satara, Tension due to Wed: Four injured, two suspects arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.