युपीतल्या सहारणपुरमध्ये दंगलीत २ ठार, १२ जखमी

By Admin | Updated: July 26, 2014 17:28 IST2014-07-26T17:28:45+5:302014-07-26T17:28:45+5:30

जमिनीच्या मालकीवरून असलेल्या वादाचे पर्यवसान दोन समाजातील दंगलीमध्ये झाले असून यामध्ये दोन जणांनी प्राण गमावले आहेत

Two killed and 12 wounded in riots in Saharanpur in UP | युपीतल्या सहारणपुरमध्ये दंगलीत २ ठार, १२ जखमी

युपीतल्या सहारणपुरमध्ये दंगलीत २ ठार, १२ जखमी

ऑनलाइन टीम

सहारनपूर, दि. २६ - जमिनीच्या मालकीवरून असलेल्या वादाचे पर्यवसान दोन समाजातील दंगलीमध्ये झाले असून यामध्ये दोन जणांनी प्राण गमावले आहेत तर १२ जण जखमी झाले आहेत. सहारनपूरमधील कुतूबशेर भागामध्ये ही वादग्रस्त जागा आहे. आज पहाटे एका समाजाच्या लोकांनी येथे बांधकामास सुरुवात केली. त्यास दुस-या समाजातल्या लोकांनी आक्षेप घेतला. याचे पर्यवसान भांडण व नंतर हाणामारीत झाले व या भागात दंगल उसळली. दगडविटांचा मारा एकमेकांवर करत या भागातील अनेक दुकानेही जाळण्यात आली. संपूर्ण परीसरात कर्फ्यू बजावण्यात आला असून लोकांनी शांतता पाळावी असे आवाहन पोलीस करत आहेत.
दंगलग्रस्तांवर कठोरपणे कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिले आहेत.

Web Title: Two killed and 12 wounded in riots in Saharanpur in UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.