शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरच्या बांदीपोरामध्ये चकमकीत दोन जवान शहीद, दोन दहशतवादी ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2017 08:55 IST

जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली.

ठळक मुद्देलष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले.

बांदीपोरा - जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजीन भागात बुधवारी पहाटे सुरक्षा पथके आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा पथकांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले पण आपले दोन जवानही शहीद झाले. चकमक संपलेली नसून, ऑपरेशन सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजूनही काही दहशतवादी इथे लपले असण्याची शक्यता आहे. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तय्यबाचे असल्याची माहिती आहे. 

दोन दिवसांपूर्वी बारामुल्ला येथील लाडोरा येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा ऑपरेशन कमांडर खालिद याला कंठस्नान घातले. खालिद हा बीएसएफ कॅम्पवर झालेल्या तळावरील हल्ल्याचा मास्टर माईंड होता. या चकमकीत लष्कराने कुख्यात दहशतवादी खालिद याला एका शाळेमध्ये घेरले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याआधी झालेल्या चकमकीत खालिद जखमी झाला होता. पायाला जखम झाल्याने तो याच परिसरात अडकला होता. अखेर चकमकीत लष्कराने त्याला ठार मारले. खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. 

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा सोमवारी भारत - पाकिस्तान सीमारेषेवर असणारे भारतीय लष्कराचे जवान दिवसाला पाच ते सहा दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत, असे म्हटले होते. पाकिस्तानने गोळीबार केल्यास त्यांना योग्य ते उत्तर द्या, असा आदेश दिला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं होतं.

राजनाथ सिंह यांनी सांगितलं की, 'भारतीय जवानांना पाकिस्तानवर गोळीबार न करण्याचा आदेश दिला आहे. मात्र जर त्यांनी गोळीबार केल्यास असंख्य गोळ्यांचा वर्षाव करत योग्य ते उत्तर द्या असा आदेश दिला आहे'. यावेळी राजनाथ सिंह यांनी डोकलाम मुद्द्यावरही भाष्य केलं. 'भारत आता अजिबात दुबळा देश नाही, एक मजबूत देश झाला आहे. चीनसोबत वादग्रस्त मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी भारताचा नेहमीच पुढाकार होता', असं राजनाथ सिंह बोलले  होते.  

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवाद