काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद
By Admin | Updated: August 16, 2014 16:28 IST2014-08-16T15:47:20+5:302014-08-16T16:28:50+5:30
जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानांवर केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले.

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात २ जवान शहीद
ऑनलाइन टीम
श्रीनगर, दि. १६ - जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी बीएसएफच्या (सीमा सुरक्षा दल) जवानांवर केलेल्या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले असून ४ जण जखमी झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफचे जवान पुलवामा जिल्ह्यातून श्रीनगरकडे परतत असताना शनिवारी दुपारी दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सहा जवान जखमी झाले त्यापैकी दोघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. श्रीनगरपासून ३३ किमी अंतरावर असलेल्या आवंतीपुरा येथे हा हल्ला झाला आहे.