लपाछपी जीवावर बेतली, कारमध्ये दोन मुलींचा करूण अंत
By Admin | Updated: September 10, 2015 14:07 IST2015-09-10T14:07:12+5:302015-09-10T14:07:12+5:30
लपाछपी खेळताना कारमध्ये अडकलेल्या २ व ४ वर्षांच्या दोन मुलींचा गुदमरून अंत झाल्याची करूण घटना येथे घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशी व ऋतिका या बहिणी

लपाछपी जीवावर बेतली, कारमध्ये दोन मुलींचा करूण अंत
>ऑनलाइन लोकमत
गुरगाव, दि. १० - लपाछपी खेळताना कारमध्ये अडकलेल्या २ व ४ वर्षांच्या दोन मुलींचा गुदमरून अंत झाल्याची करूण घटना येथे घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हिमांशी व ऋतिका या बहिणी घराजवळ असलेल्या कारमध्ये खेळता खेळता शिरल्या. अनेक तास त्यांचा ठावठिकाणा लागत नव्हता, परंतु त्यानंतर घरच्यांना या मुली गाडीत असल्याचे लक्षात आले. त्यांना बाहेर काढून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अनेक तास गाडीत राहिल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. या मुली खेळता खेळता गाडीत कधी गेल्या हे कुणालाच कळलं नसल्याचं सांगण्यात येत असून शवविच्छेदन करण्यात येणार आहे. या दुर्देवी मुली सतबिरसिंग या शेतक-याच्या असून अद्याप कोणाहीविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलीस म्हणाले.