रोगमुक्ती उपचारासाठी दोन दिवसीय कार्यशाळा
By Admin | Updated: July 8, 2015 15:04 IST2015-07-07T22:56:08+5:302015-07-08T15:04:40+5:30
नाशिक : अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेण्यापेक्षा घरच्या घरी रिप्लेक्सोलॉजी ॲक्युप्रेशरव्दारे उपचार करू शकतात. याचविषयी शास्त्रीय माहिती देण्यासाठी लोकमत सखी मंचाच्या वतीने सेल्फ ट्रीटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच रोगमुक्ती कार्यशाळा येत्या ११ व १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.

रोगमुक्ती उपचारासाठी दोन दिवसीय कार्यशाळा
नाशिक : अनेक छोट्या-मोठ्या आजारांसाठी वैद्यकीय उपचार घेण्यापेक्षा घरच्या घरी रिप्लेक्सोलॉजी ॲक्युप्रेशरव्दारे उपचार करू शकतात. याचविषयी शास्त्रीय माहिती देण्यासाठी लोकमत सखी मंचाच्या वतीने सेल्फ ट्रीटमेंट ट्रेनिंग प्रोग्राम म्हणजेच रोगमुक्ती कार्यशाळा येत्या ११ व १२ जुलै रोजी आयोजित करण्यात आली आहे.
नाशिक-पुणे रोडवरील बोधलेनगर येथील श्रीकृष्ण लॉन्स येथे सदरचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी डॉ. अनिल जैन व त्यांचे सहायक विषयतज्ज्ञ जैन रिफ्लेक्सोलॉजी ॲक्युप्रेशर चिकित्सा प्रणालीवर मार्गदर्शन करणार आहेत. कॉम्प्युटराईज्ड स्लाईड शोव्दारे सादरीकरण करणार असून, सैध्दांतिक मांडणी करणार आहेत. अनेक विकारांवर मुक्ती मिळवण्याचे मार्ग उपलब्ध आहेत. थोडीशी माहिती आणि प्रशिक्षणाव्दारे विकारांवर मात करता येणे शक्य आहे. याबाबत या दोन दिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. दोन्ही दिवस सकाळी साडेअकरा वाजता कार्यशाळेला प्रारंभ करण्यात येईल.
सखी मंच सदस्य आणि सदस्य नसलेल्यांनाही कार्यशाळेत सहभागी होता येईल. सखी मंच सदस्यांकरिता प्रवेश शुल्क १०० रुपये, तर इतरांसाठी २०० रुपये आहे. प्रथम येणार्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून, लहान मुलांना प्रवेश नाही. तसेच ज्यांना या कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळेल त्यांनी येताना सोबत सतरंजी आणावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
(प्रतिनिधी)