श्री म्हसोबा महाराजांचा दोन दिवशीय यात्रौत्सव

By Admin | Updated: April 15, 2016 22:45 IST2016-04-15T01:55:24+5:302016-04-15T22:45:41+5:30

नाशिक : सिडको जवळील उंटवाडी येथील सुमारे ८० वर्षा पुर्वीच्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात यंदाही येत्या शनिवार दि. २३ व रविवार दि. २४ एप्रिल २०१६ असे दोन दिवस यात्रौत्सव साजरा होत आहे.

Two-day pilgrims of Shri Mhosa Maharaj | श्री म्हसोबा महाराजांचा दोन दिवशीय यात्रौत्सव

श्री म्हसोबा महाराजांचा दोन दिवशीय यात्रौत्सव

नाशिक : सिडको जवळील उंटवाडी येथील सुमारे ८० वर्षा पुर्वीच्या श्री म्हसोबा महाराज मंदिरात यंदाही येत्या शनिवार दि. २३ व रविवार दि. २४ एप्रिल २०१६ असे दोन दिवस यात्रौत्सव साजरा होत आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशीशनिवारी सकाळी ९ वाजता महापुजा, त्यानंतर महाप्रसाद, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी भजन, किर्तन, भारउड, नाट्य, वग असे कार्यक्रम रात्रक्ष १० वाजे पर्यंत होईल.
दुसर्‍या दिवशी रविवारी धार्मिक पुजा व दुपारी ३ ते सायंकाळी ६ यावेळेत जिल्हा व जिल्‘ाबाहेरील नामांकित पहिलवानांच्या कुस्त्यांची दंगल होत आहे. कुस्ती शौकिनांनी त्याचा आनंद घेण्याचे आवाहन श्री म्हसोबा महाराज कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल तिडके, उपाध्यक्ष मधुकर तिडके, सचिव सदाशिव नाईक, सहसचिव फकिरा तिडके, खजिनदार दिनकर तिडके आदींनी केले ्राहे.

Web Title: Two-day pilgrims of Shri Mhosa Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.