इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 05:47 IST2025-07-17T05:47:11+5:302025-07-17T05:47:28+5:30
११ जुलैला पोलिसांच्या गस्ती दरम्यान नीना आणि तिच्या दोन मुली गोकर्णातील रामतीर्थ टेकडीच्या वरच्या गुहेत राहत असल्याचे आढळले.

इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
बेंगळुरू : कर्नाटकातील गोकर्णमधील एका गुहेत रशियन महिला तिच्या मुलांसह राहत असल्याचे आढळून आले आहे. २०१७ मध्ये तिच्या व्हिसाची मुदत संपली होती; पण, ती भारतातच राहिली. तिच्याबरोबर ६ व ८ वर्षांच्या दोन मुली आहेत. “जवळच्या व्यक्ती गमावल्याने व इतर कारणांमुळे मी रशियाला परतले नाही,” असे या महिलेने सांगितले.
रशियन महिला नीना कुटीना म्हणाली की, गेल्या १५ वर्षांत मी सुमारे २० देशांमध्ये फिरली आहे. माझी मुले वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आली आहेत. ११ जुलैला पोलिसांच्या गस्ती दरम्यान नीना आणि तिच्या दोन मुली गोकर्णातील रामतीर्थ टेकडीच्या वरच्या गुहेत राहत असल्याचे आढळले. चौकशी केली असता, ४० वर्षीय नीनाने दावा केला की ती आध्यात्मिक एकांत शोधण्यासाठी गोव्याहून गोकर्णला आली. तिने तिची दिनचर्याही सांगितली.
चार वर्षांपासून मुलींना भेटण्यासाठी येतो भारतात
रशियन महिलेच्या पतीने सांगितले की, ती त्याला न कळवता गोवा सोडून गेली. इस्रायलचे रहिवासी ड्रोर गोल्डस्टीन यांनी सांगितले की, ते गेल्या चार वर्षांपासून त्यांच्या मुलींना भेटण्यासाठी भारतात येत आहेत. काही महिन्यांपूर्वी नीना मला न कळवता गोवा सोडून गेली. त्यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आणि नीना आणि त्यांच्या मुली गोकर्णात राहत असल्याचे आढळले.