TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 15:20 IST2025-02-27T15:19:48+5:302025-02-27T15:20:12+5:30
Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.

TTD च्या वैद्यकीय संस्थेला ८१ लाख रुपयांची देणगी, गरिबांवर होतायेत मोफत उपचार!
Tirumala Tirupati Devasthanam : तिरुमला तिरुपती देवस्थानमची (टीटीडी) वैद्यकीय धर्मादाय संस्था 'श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्ट' ला तामिळनाडूच्या दोन कंपन्यांकडून एकूण ८१ लाख रुपयांची देणगी मिळाली आहे.
तिरुमला येथील टीटीडीचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी व्यंकय्या चौधरी यांच्याकडे देणगीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले. बुधवारी रात्री टीटीडीने जारी केलेल्या प्रेस रिलीजनुसार, चेन्नईस्थित कंपनी अॅक्सेस हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडने ७० लाख रुपये आणि तामिळनाडूस्थित आणखी एक कंपनी वारा फ्युचरने ११ लाख रुपये देणगी दिली.
श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्ट हे गरीब रुग्णांच्या हृदय, मेंदू, कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर मोफत उपचार करते. साधारणपणे या आजारांवर उपचार खूप महाग असतात, त्यामळे ते सर्वांना परवडत नाहीत. अशा परिस्थितीत, हे ट्रस्ट गरजू रुग्णांना मदत करते.
याशिवाय, श्री वेंकटेश्वर (एसव्ही) प्राणदान ट्रस्टकडून गंभीर मूत्रपिंड रोग, हिमोफिलिया (रक्तस्त्राव समस्या), थॅलेसेमिया (रक्त विकार) आणि इतर धोकादायक आजारांच्या उपचारांवर संशोधन करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
ट्रस्टचे काम काय?
- गरीब रुग्णांना मोफत महागडे उपचार उपलब्ध करून देणे.
- गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन देणे.
- किडनी, हिमोफिलिया, थॅलेसेमिया आणि कर्करोग यांसारख्या जीवघेण्या आजारांच्या उपचारांमध्ये मदत करणे.
- हे ट्रस्ट गरिबांना रक्तपेढी, कृत्रिम अवयव, फिजिओथेरपी आणि प्रत्यारोपण यासारख्या मूलभूत सुविधा मोफत पुरवते.
- अशाप्रकारे, ट्रस्ट गरजू रुग्णांना जीवनरक्षक मदत पुरवते.