शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'जबरा फॅन', घरातून दूध आणण्यासाठी पैसे घेऊन ती मुलं आली अमिताभ आणि कोहलीला भेटण्यासाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 11:17 IST

मुंबईत आल्यानंतर ते अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर आले पण त्यांची अमिताभशी भेट नाही होऊ शकली.

मुंबई  : आपल्या आवडत्या कलाकारासाठी फॅन कोणत्याही थराला जायला तयार असतात. मग ते बॉलिवूड असो अथवा क्रिकेट असो प्रत्येक ठिकाणी चाहते असतातचं. भारतीय तरुणाईच्या गळ्यातील ताईत असेल्या विराट कोहली आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या फॅन्सची संख्या खूप आहे. त्यांच्या एका भेटीला चाहते काहीही करायला तयार होतात. अशीच उत्तरप्रदेशमधील दोन अल्पवयीन मुलं  विराट आणि अमिताभ यांची मोठी फॅन आहेत. अमिताभ आणि विराटला भेटण्यासाठी यांनी थेट मुंबई गाठली तेही घरच्यांना न सांगता. यामध्ये एक 10 आणि दुसरा 14 वर्षाचा मुलगा आहे. ही दोन्ही मुलं सख्खे भाऊ आहेत. दोघाही भावांची नावं अमन आणि भावेश अशी आहेत. हे दोघेही मथुरेच्या गौरानगर कॉलनीत राहणारे आहेत.

मथुरा येथील ही दोन मुलं घरातून दूध आणण्यासाठी पैसे घेऊन निघाले ते थेट ट्रेन मध्ये बसून मुंबईला आले. त्यावेळी त्यांच्या खिशात दुधाच्या पैशाशिवाय सोबत अपली पॉकेटमनी होता. मुंबईत आल्यानंतर ते अमिताभ यांच्या जलसा या बंगल्यावर आले पण त्यांची अमिताभशी भेट नाही होऊ शकली. नंतर दुसऱ्या मित्राने विराटला भेटण्याची इच्छा व्यक्त केली पण रात्र होत असल्यामुळे दोघेही परत जाण्यासाठी स्टेशनवर जाताना चुकून ते महिलांच्या डब्ब्यात बसले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकलं असता सर्व प्रकार मुंबई पोलिसांच्या लक्षात आला.

पोलिसांनी त्या दोघांची चौकशी केली असता सर्व प्रकार समोर आला. ही दोन्ही मुलं विराट कोहली आणि अमिताभ यांना भेटण्यासाठी मुंबईला आले होते. पोलिसांनी पोलिसांनी त्याच्या घरी संपर्क केल्यानंतर दोघेही घरून बेपत्ता असल्याचे समोर आले.  घरच्यांनी पोलिसात दोघांचे अपहरण झाल्याच्या संशयावरून तक्रार केलेली होती. पोलिसांच्या सूचनेनंतर या दोघांचे कुटूंबिय मुंबईत आले आणि त्यांनी या दोघांनाही आपल्या घरी परत आणलं.

  

टॅग्स :Virat Kohliविराट कोहलीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनCricketक्रिकेटUttar Pradeshउत्तर प्रदेश