दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2018 11:26 IST2018-10-04T11:26:24+5:302018-10-04T11:26:56+5:30

उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली.

Two brothers were shot dead by two men in Lucknow | दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

दोन भावांची गोळ्या घालून केलेल्या दुहेरी हत्याकांडानं लखनऊमध्ये खळबळ

लखनऊ- उत्तर प्रदेशची राजनाधी लखनऊमध्ये दुहेरी हत्याकांडानं हादरली आहे. या हत्याकांडानंतर लखनऊमध्ये एकच खळबळ उडाली. ठाकूरगंजमधल्या मुसाहिब गंज येथे कारमधून जाणारे दोघे सख्खे भाऊ इम्रान आणि अरमानला हल्लेखोरांनी रस्त्यात थांबवून बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची गोळ्या मारून हत्या करण्यात आली. दोन्ही भावांचे त्या आरोपींबरोबर वाद होते. पोलिसांनी या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल ऊर्फ छोटूला अटक केली आहे.
 
पूर्व एसपी आणि पश्चिम एसपी यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही घटना ठाकूरगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणा-या मुसाहिब गंजजवळ झाली आहे. त्या दोन्ही भावांना जवळपास 30 मिनिटांपर्यंत आरोपींनी बेदम मारहाण केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात सशस्त्र दलाचे पोलीस तैनात करण्यात आले आहेत.



 

Web Title: Two brothers were shot dead by two men in Lucknow