शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 12:48 IST

राजस्थानमधील जैसलमेरमधील सादेवाला भागात भारत-पाकिस्तान सीमेजवळ एका मुलाचे आणि मुलीचे मृतदेह आढळले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे आहेत. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे सापडली आहेत.

राजस्थानमधील जैसलमेर येथील भारतपाकिस्तान सीमेजवळ एका १५ वर्षीय मुलीचे आणि तरुणाचे मृतदेह सापडले आहेत. हे मृतदेह सुमारे ६-७ दिवसापूर्वीचे असल्याचे सांगितले जात आहे. मृतदेहांजवळ पाकिस्तानी सिम कार्ड आणि ओळखपत्रे आढळली आहेत. हे दोघेही पाकिस्तानी असल्याचे समोर आले आहे. 

Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही मृतदेह भारत-पाकिस्तान सीमेच्या कुंपणाच्या आत सुमारे १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या भारतीय सीमेवरील साडेवाला परिसरात आढळले. तनोट पोलिसांनी दोन्ही मृतदेह रामगड सीएचसीच्या शवागारात ठेवले आहेत. दोघांच्याही मृत्यूचे कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल. हे दोघेही भारतातील आहेत की पाकिस्तानी आहेत याचा तपास सुरू आहे.

पाकिस्तानी ओळखपत्र, सिमकार्ड देखील जप्त 

या दोघांच्या मृतदेहाजवळ सापडलेल्या तरुणाचे नाव रवी कुमार वडिलांचे नाव दिवान जी, तर मुलीच्या कार्डवर शांती बाई असं नाव आहे. मुलगी अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील रहिवासी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सिमकार्ड आणि ओळखपत्रांसह सापडलेल्या मृतदेहांबाबत सुरक्षा संस्था, सीमा सुरक्षा दल, जैसलमेर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

जवळच्या गावांमध्येही चौकशी सुरू आहे. पाकिस्तानचा व्हिसा घेतल्यानंतर दोघेही जैसलमेरमध्ये राहत असण्याची शक्यता आहे. यासोबतच, त्यांनी काटेरी तारांचे कुंपण ओलांडले असण्याचीही शक्यता आहे. सुरक्षा एजन्सी तपास करत आहेत.

टॅग्स :Rajasthanराजस्थानPakistanपाकिस्तानIndiaभारत