शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
2
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
3
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
4
"...तर काँग्रेसनं सांगावं, 'याचा' अर्थ काय?" मनमोहन सिंगांच्या वक्तव्यावरून अमित शाह यांचा हल्लाबोल
5
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
6
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
7
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
8
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
9
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
10
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
11
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
12
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
13
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
14
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
15
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
16
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
17
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
18
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
19
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
20
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश

कुमारस्वामी आणि देवेगौडांवर आक्षेपार्ह शब्दात टीका केल्याने दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 4:48 PM

फेसबूक लाइव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे.

बंगळुरू - फेसबूक लाइव्हदरम्यान कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने पोलिसांनी दोन तरुणांना अटक केली आहे. सिद्धराजू आणि जौमराजू अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही तरुणांची नावे आहेत. दरम्यान, कर्नाटकमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मात्र या अटकेच्या कारवाईला विरोध केला आहे.  अटक केलेल्या व्यक्तींनी 23 मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर फेसबूक लाइव्ह केले होते. फेसबूक लाइव्हदरम्यान त्यांनी एच.डी. कुमारस्वामी, एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामींचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर या दोघांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी या दोघांना अकट केली आहे. तसेच संबंधित फेसबूक लाइव्हचा व्हिडिओसुद्धा डिलीट करण्यात आला आहे.  दरम्यान, उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याने एका पत्रकाराला अटक केल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारत पत्रकार प्रशांत कनौजिया यांची मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशमधील पत्रकार अटक प्रकरणावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली होती. तसेच योगी आदित्यनाथ हे मुर्खपणाचे काम करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला होता. मात्र आता कर्नाटकमध्ये झालेल्या अटक प्रकरणावरून भाजपाने राहुल गांधी यांना प्रतिटोला लगावला आहे.  कुमारस्वामी, अण्णा, तुमचे मित्र राहुल गांधी म्हणतात की तुमच्याविरोधात मिम, ब्लॉग लिहिणाऱ्यांना अटक करणे हा मुर्खपणा आहे. मात्र ते तुमचे नाव घेण्यास घाबरत आहेत. तुमचे नाव घेतल्यास तुम्ही नाराज होऊन आघाडीतून बाहेर पडाल आणि कर्नाटकमधूनही त्यांचा पक्ष सत्तेतून बाहेर पडेल, अशी त्यांना भीती वाटते, असा टोला भाजपाने राहुल गांधी यांचे ट्विट रिट्विट करून लगावला आहे.   

टॅग्स :h d deve gowdaएच. डी. देवेगौडाkumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटक