दोन विमानांची टक्कर टळली, 330 प्रवासी सुखरुप
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 14:13 IST2018-07-12T14:12:08+5:302018-07-12T14:13:45+5:30
बंगळुरु हवाई क्षेत्रात दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. या दोन्ही विमानातून 330 प्रवासी प्रवास करत होते.

दोन विमानांची टक्कर टळली, 330 प्रवासी सुखरुप
मुंबई - जवळपास 330 प्रवाशी असलेल्या इंडिगो एअरलाईन्सच्या दोन विमानांची टक्कर थोडक्यात टळली. अवकाशातील बंगळुरु हवाई क्षेत्रात आज ही घटना घडली. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. कोईम्बतूर-हैदराबाद आणि बंगळुरू-कोचीन असा प्रवास या विमानांकडून करण्यात येत होता.
इंडिगो एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हैदराबादकडे निघालेल्या विमानात 162 प्रवासी होती. तर दुसऱ्या विमानातून 166 प्रवासी प्रवास करत होते. बंगळुरू हवाई क्षेत्रात केवळ 200 फूट अंतरावरांनी या विमानांची टक्कर टळली. दरम्यान, यावेळी विमानांचा अपघात टाळणारी यंत्रणा बंद होती.