खून प्रकरणी दोन आरोपी अटकेत

By Admin | Updated: April 16, 2016 01:40 IST2016-04-16T01:34:03+5:302016-04-16T01:40:36+5:30

परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथे मंगळवारी पहाटे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना

Two accused in murder case | खून प्रकरणी दोन आरोपी अटकेत

खून प्रकरणी दोन आरोपी अटकेत


परभणी : सेलू तालुक्यातील वालूर येथे मंगळवारी पहाटे एका ६० वर्षीय शेतकऱ्याचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने १५ एप्रिल रोजी कौसडी, वालूर येथून ताब्यात घेतले. या आरोपींना सेलू पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले.
शेतात झोपलेले शेतकरी रामकिशन कुंडलिक डुबे (६०) यांचा अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात हत्याराने वार करुन खून केला होता. ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा तपास स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पथकाकडे देण्यात आला. त्यावरुन पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीद्वारे सदरील खून हा जमिनीच्या वादातून झाला असल्याचे समजले. यात पथकाने शुक्रवारी जिंतूर तालुक्यातील कौसडी येथून सर्जेराव लिंबाजी लगड (३२) व वालूर येथून रामचंद्र रामकिशन डुबे यास ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात अन्य एका आरोपीचा सहभाग असून या आरोपीचा शोध पथकाकडून सुरु आहे. दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिल्याने त्यांना सेलू पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले. ही कारवाई सुरेश टाकरस, सुग्रीव केंद्रे, निलेश भूजबळ, संजय घुगे, गणेश कौटकर, शंकर गायकवाड यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: Two accused in murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.