Twelve coaches of Purba Express collapsed in Kanpur and several passengers were injured | कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले, अनेक प्रवासी जखमी

कानपूरः उत्तर प्रदेशमधल्या कानपूरमध्ये पूर्वा एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले आहे. अचानक धावत्या ट्रेनचे 12 डबे घसरल्यानं प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात 100हून अधिक प्रवासी जखमी असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हावडा येथून नवी दिल्लीला जात असलेल्या पूर्वा एक्सप्रेस (12303)ला शुक्रवारी रात्री जवळपास 1 वाजताच्या दरम्यान दुर्घटनाग्रस्त झाली आहे. कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. 


कानपूरपासून जवळपास 15 किलोमीटर दूरवर असलेल्या रुमा गावाजवळ हा अपघात घडला आहे. या डब्यामध्ये 8 एसी कोच आणि पेंट्रीचा समावेश आहे. रात्री अडीच 2.30 जिल्हाधिकारी, एसएसपी, 30 अँब्युलन्स, फायर ब्रिगेड आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, बचावकार्य राबवलं जात आहे. जखमींना काशीराम ट्रामा सेंटर आणि हॅलट रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. एनडीआरएफच्या 45 जणांची फौज घटनास्थळी पोहोचली असून, डब्यात अडकलेल्यांना बाहेर काढलं जात आहे. या दुर्घटनेत अद्यापही कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
रेल्वे प्रशासनानं हेल्पलाइन नंबर जारी केला असून, 05122323015 या नंबरवर संपर्क साधण्यास सांगितलं आहे. 


Web Title: Twelve coaches of Purba Express collapsed in Kanpur and several passengers were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.