शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

वाहता नळ दिसल्यास कनेक्शन बंद

By admin | Published: May 06, 2016 12:20 AM

अभिजित वायकोस : तासगावात पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन

तासगाव : तासगाव शहरातील प्रत्येक नागरिकाने पाण्याचा वापर काटकसरीने करून वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी पाऊल उचलावे, असे आवाहन मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी केले. पाण्याचे पैसे भरत आहे म्हणून पाणी वाया घालविण्याचा अधिकार नाही, असे सांगतानाच ज्या नळधारकांच्या नळातून पाणी वाहून वाया जाताना दिसेल व ज्यांच्या नळातील पाण्याचा गैरवापर होताना दिसेल, त्यांचे नळ कनेक्शन सक्तीने बंद करण्यात येईल, असा इशाराही वायकोस यांनी दिला आहे. तसेच पाण्याच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपरिषदेने पाणी पाहणी पथक तयार केले असल्याचेही सांगण्यात आले.अन्य शहरांच्या तुलनेत तासगाव शहरात समाधानकारक, सुरळीत व नियमितपणे पाणी पुरवठा सुरू आहे. याहूनही अधिक चांगला पाणी पुरवठा व्हावा यासाठी नगरपरिषदेच्यावतीने होत असलेल्या टप्पा क्रमांक - ३ योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे, असेही वायकोस यांनी सांगितले.तासगाव शहरात मागणीनुसार नळपाणी कनेक्शन देण्यात येत असून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न नगरपरिषद पदाधिकारी व प्रशासन करत आहे. असे असताना, पुरेसे पाणी येऊनही काही नागरिक नळ वाहता ठेवत आहेत. त्यामुळे काही नागरिकांना अपुरा पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नगरपरिषदेकडे करण्यात आली आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचा मोठा फटका बसताना असताना सांगली जिल्हाही यापासून सुटला नाही. जिल्ह्यात अनेक भागात पाण्याची तीव्र समस्या जाणवत आहे. ही समस्या दूर करण्यासाठीच प्रशासनाकडून असे पाऊल उचलले गेलेल्याचे सांगण्यात आले. तालुक््यातील प्रत्येक नागरिकाने पाणी बचत होण्यासाठी बचत करणे गरजेचे असल्याचेही सांगण्यात आले. यापुढील काळात पाण्याबाबत कु ठे हलगर्जीपणा दिसत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला.तासगावातील प्रत्येक नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून वाया जाणारे पाणी थांबविण्यासाठी पाऊल उचलावे. पाणी हा आपला हक्क नसून गरज म्हणून ते पुरविण्यात येते. त्याचा वापर प्रत्येकाने जबाबदारीने व गरज म्हणून करावा. केवळ पाण्याचे पैसे भरत आहे, म्हणून पाणी वाया घालविण्याचा अधिकार नाही. पाण्याचे महत्त्व सर्वांनी जाणून त्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन करून, यापुढे ज्या नळधारकांच्या नळातून पाणी वाहून वाया जाताना दिसेल, त्याचे व्हिडीओ शूटिंग करून जागेवर पंचनामा करून, त्याचे नळ कनेक्शन सक्तीने बंद करण्यात येईल, असा इशाराही मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांनी दिला आहे. (वार्ताहर)तक्रारींची दखल : प्रशासन कडक नगरपरिषदेकडे आलेल्या तक्रारींची दखल घेऊन नगरपरिषदेत नव्याने तयार करण्यात आलेल्या पाणी पाहणी पथकाने व्हिडीओ कॅमेऱ्यासह गुरुवार पेठ भागात प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही नागरिकांच्या नळांना पाण्यासाठी लावण्यात येणाऱ्या तोट्या नव्हत्या. यावेळी त्यांना पाणी बचतीविषयी समज देण्यात आली आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्याची सूचनाही करण्यात आली आहे. यापुढील काळात पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी प्रशासन कडक धोरण राबवणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.तपासणीसाठी पाणी पाहणी पथकाची नेमणूकशहरातील पाणी पुरवठ्यावर नियंत्रण व देखरेख करण्यासाठी नगरपरिषदेने पाणी पाहणी पथक तयार केले आहे. यामध्ये प्रताप घाटगे, प्रकाश भोसले, रमाकांत शितोळे, संजय सूर्यवंशी, कैलास खटावकर, प्रवीण धाबुगडे, वैभव गेजगे, दीपक स्वामी यांचा समावेश आहे.