शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

एका लग्नाची गोष्ट! आंध्र प्रदेशचा नवरदेव अन् तुर्कीची नवरी, 5000 किमीचा प्रवास करून बांधली लग्नगाठ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2021 15:20 IST

भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या एक परदेशी तरुणीने थेट आंध्र प्रदेशमध्ये येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह केला आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले होते. याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे. भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या एक परदेशी तरुणीने थेट आंध्र प्रदेशमध्ये येऊन त्याच्याशी पारंपरिक पद्धतीनं विवाह केला आहे. यासाठी तिने हजारो किलोमीटरचं अंतर पार केलं आहे. दोघांचा आधीच साखरपुडा झाला होता. मात्र एकमेकांवर मनापासून प्रेम करणाऱ्या या जोडप्याला घरच्यांची परवानगी मिळवण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर आता त्यांनी लग्नगाठ बांधली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मूळचा आंध्रप्रदेशमधील गुंटूरचा असणारा मधू संकिरथ हा काही कामानिमित्त तुर्कीमध्ये राहत होता. 2016 मध्ये तुर्कीतील गिजेम नावाच्या तरुणीशी त्याची ओळख झाली. दोघंही एकाच संस्थेत आणि एकाच विभागात काम करत होते. मधूचा मदत करण्याचा आणि खेळकर स्वभावामुळे त्याची गिजेमशी मैत्री झाली आणि काही दिवसांतच या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनीही या प्रेमाचं रुपांतर लग्नात करावं, असा निर्णय घेतला आणि त्यासाठी आपले विचार घरच्यांना सांगितले.

2019 मध्ये झाला दोघांचा साखरपुडा

लग्नाच्या निर्णयाबाबत समजताच दोन्ही कुटुंबीयांनी याला कडाडून विरोध केला. त्यांना हे लग्न मान्य नव्हतं. मधू आणि गिजेम यांनी घरच्यांची समजूत काढली. त्यांना आपण एकमेकांसाठी योग्य जोडीदार असल्याचं पटवून दिलं. त्यानंतर कुटुंबीयांनी देखील परवानगी दिली. 2019 मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला आणि 2020 मध्ये त्यांना लग्न करायचं होतं. मात्र नेमका त्याच काळात कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे दोघंही आपापल्या देशांत अडकून पडले. 

दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत विवाहसोहळा पडला पार

जुलैमध्ये विमानसेवा सुरू झाल्यानंतर मधू तुर्कीला गेला आणि तिथं दोघांनी तिथल्या पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर दोघंही भारतात आले आणि दाक्षिणात्य पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला आहे. पारंपरिक तेलुगु पद्धतीने झालेल्या या लग्न सोहळ्यासाठी जवळचे निमंत्रित उपस्थित होते. सर्वांनी परदेशी वधू आणि देशी वराला भरभरून आशीर्वाद दिले. Map Data नुसार, तुर्की ते गुंटूर हे अंतर 5 हजार किलोमीटरहून अधिक आहे. त्यामुळे लग्नासाठी वधूने केलेल्या या प्रवासाची चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :marriageलग्नIndiaभारत