टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 06:53 IST2020-12-13T02:26:28+5:302020-12-13T06:53:26+5:30
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी शारजील इमाम, उमर खालीद, गौतम नवलखा आदींचे फलक लागले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर रविशंकर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली.

टुकडे टुकडे गँगने घेतला शेतकरी आंदोलनाचा ताबा -रविशंकर प्रसाद
नवी दिल्ली : देशातील टुकडे टुकडे गँगने शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा ताबा घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर सरकारची सुरू असलेली बोलणी निष्फळ ठरण्याची शक्यता आहे, असा आरोप केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.
शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी शारजील इमाम, उमर खालीद, गौतम नवलखा आदींचे फलक लागले आहेत. त्यासंदर्भातील प्रश्नावर रविशंकर प्रसाद यांनी ही प्रतिक्रिया दिली.
शेतकरी व सरकार यांच्यातील चर्चेतून योग्य तोडगा निघायला हवा, अशी सदिच्छा भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू व धडाकेबाज फलंदाज युवराज सिंहने व्यक्त केली आहे. १२ डिसेंबर रोजी असलेला वाढदिवस युवराजसिंह याने कोरोना साथ व शेतकरी आंदोलनामुळे साजरा केला नाही.
डावे पक्ष, माओवाद्यांची घुसखोरी - पीयूष गोयल
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात आता डावे पक्ष व माओवाद्यांनी घुसखोरी केली आहे, असा गंभीर आरोप केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला. ते म्हणाले की, डाव्या संघटनांना शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या आडून आपले हेतू साध्य करायचे आहेत. या लोकांनी दाखविलेल्या कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी चर्चा करावी.