शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

क्षयरोग दिन विशेष : क्षयरोगाने मृत्यू होणाऱ्या देशांमध्ये भारताचा पहिला नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2019 20:11 IST

संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर

मीरारोड - २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिन! क्षयरोगामुळे होणारे मृत्यु आणि रुग्णांच्या संख्येत जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारी नुसार भारताचा पहिला क्रमांक लागत आहे. तर याच आकडेवारीनुसार महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याची महिती वैद्यकिय क्षेत्रातील मान्यवरांनी दिली आहे. गरीबी, कुपोषण व अस्वछता क्षयरोग वाढण्यास कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.संसर्गजन्य आजारांमध्ये रु ग्णांची वाढती संख्या व गंभीर आजारामुळे ओढवलेला मृत्यू यामध्ये कोणता आजार आघाडीवर असेल तर तो म्हणजे क्षयरोग! जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार आणि विश्व टीबी रिपोर्टच्या आधारानुसार जगातील ६४ टक्के क्षयरोगाचे रु ग्ण हे भारत, इंडोनेशिया, चीन, फिलिपिन्स, नायजेरिया, पाकिस्तान व साऊथ आफ्रीका या सात देशांमध्ये आढळतात. या सात देशां पैकी भारताचा क्र मांक सर्वात वरचा लागतो.२०१६ साली जगभरात ४ लाख २३ हजार नागरिकांचा मृत्यू क्षयरोगामुळे झाला होता. २०१८ च्या आकडेवारीनुसार देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये २ लाख ५४ हजार ७१७ क्षयग्रस्त होते या राज्यात कानपूर जिल्ह्यात १२ हजार ८६३ क्षयरोगांची संख्या होती.उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्र आणि गुजरातचा नंबर लागतो. महाराष्ट्रात १ लाख ६४ हजार ११३ तर गुजरातमध्ये १ लाख २३ हजार १०१ क्षयरोगग्रस्त आहेत. या शिवाय छोटी खेडी व दुर्गम भागातील क्षयरोगग्रस्तांची संख्या यामध्ये मोजलेली नाही. जगात दर मिनिटाला क्षय रोगामुळे एक व्यक्ती दगावते आणि यामध्ये जागतिक स्तरावर भारत आघाडीवर आहे.फुफुसरोग तज्ञ डॉ पार्थीव शहा सांगतात की, क्षयरोगाचे जंतू हे अतिसूक्ष्म असून ते क्षयरु ग्णाच्या शिंकण्या, खोकण्या वा थुंकण्यातून हे हवेत मिसळतात व श्वासावाटे इतर व्यक्तींच्या शरीरात शिरतात. आपल्याकडे उघड्यावर थुंकणे सर्वमान्य असल्यामुळे जंतूंचा फैलाव सुलभपणे होतो. क्षयजंतूंचा संसर्ग झाल्यावर क्षयरोगाची लागण त्या व्यक्तीची शारीरिक स्थिती व पोषण यावर अवलंबून असते. रोग प्रतिकारकशक्ती कमी असल्यास क्षयरोग होऊ शकतो.क्षयरोग झाला की तो लपवण्याची वृत्ती आजही शिक्षित व अशिक्षित नागरिकांमध्ये आढळून येते. सार्वजनिक अस्वच्छता, इतस्तत: थुंकणे, दाटीवाटीच्या वस्तीमुळे घरामध्ये सूर्यप्रकाश न येणे, सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था अशा अनेक बाबी क्षयरोगाच्या समस्येस कारणीभूत आहे.

क्षयरोग वाढणे म्हणजेच त्या देशामध्ये वाढलेली गरिबी, कुपोषण, आर्थिक विषमता, गचाळ औद्योगिकीकरण व शहरीकरण हे मुद्दे अधोरेखित होत असल्याचे ते म्हणाले.मुंबई, ठाणे आदी मोठया महानगरात देशभरातून आलेले लोक आपल्या सवयी नुसार जगू पाहतात. बकालपणात भर टाकतात. शहरातील श्रीमंत असो की, गरीब कचरा टाकणे, थुंकणे, पान-तंबाखू खाऊन थुंकणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे या सगळया गोष्टी राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी होत असतात.मोठ्या शहरांची ही स्थिती आहे तर मग निमशहरी आणि ग्रामीण भागाची स्थिती किती बिकट असेल, याची कल्पनाच न केलेली बरी. एक रोगी अनेक जणांना क्षयरोगबाधित करू शकतो, अशी माहिती डॉ अमित थडानी यांनी दिली.

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य