अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: April 9, 2016 16:43 IST2016-04-09T16:22:12+5:302016-04-09T16:43:38+5:30

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांची सम-विषम फॉर्म्युलावर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला

Trying to throw a boot on Arvind Kejriwal | अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

अरविंद केजरीवाल यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. ९ - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अरविंद केजरीवाल यांची सम-विषम फॉर्म्युलावर पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. एका तरुणाने हा बूट फेकला मात्र त्यामागचे नेमके कारण अजून कळू शकलेलं नाही. तरुणाला लोकांनी पकडून पत्रकार परिषदेतून बाहेर नेले. 
 
तरुणाने एक सीडीदेखील केजरीवांच्या दिशेने भिरकावली असल्याची माहिती मिळत आहे. अरविंद केजरीवाल या पत्रकार परिषदेत 15 एप्रिलपासून सुरु होणा-या सम-विषम फॉर्म्युलासंबंधी माहिती देत होते. तरुणाने भिरकावलेला बूट केजरीवाल यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीने अडवल्याने त्यांच्यापर्यत पोहोचू शकला नाही. या तरुणाचं नाव वेद प्रकाश असून तो आम आदमी सेनेचा आहे. 
 

Web Title: Trying to throw a boot on Arvind Kejriwal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.