आयआयटीएम वादावर समेटासाठी प्रयत्न सुरू
By Admin | Updated: June 3, 2015 01:26 IST2015-06-03T01:26:17+5:302015-06-03T01:26:17+5:30
आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीएमने संघटनेशी

आयआयटीएम वादावर समेटासाठी प्रयत्न सुरू
चेन्नई : आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल (एपीएससी) या विद्यार्थी संघटनेची मान्यता रद्द करण्यात आल्यामुळे उफाळलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आयआयटीएमने संघटनेशी चर्चा करीत समेटाचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सदर दलित संघटना बंदी मागे घेण्यासह संस्थेच्या व्यवस्थापनाकडून बिनशर्त माफीच्या मागणीवर अडून बसली असून विद्यार्थ्यांनी संस्थेच्या परिसरात जोरदार निदर्शने केल्यानंतर संस्थेने घाईघाईने चर्चा करीत वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांनी समोर केलेल्या मागण्या पाहता या आठवड्याच्या अखेरीस किंवा पुढील आठवड्याच्या प्रारंभी विद्यार्थी मंडळाची (बीओएस) आणीबाणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संस्थेने जारी केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत एपीएससीच्या सदस्यांनी चार ते पाच कलमी मागण्या समोर केल्या. त्यात ही मागणी केली आहे.