युवतीला जाळून मारण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: June 2, 2014 06:02 IST2014-06-02T06:02:19+5:302014-06-02T06:02:19+5:30
उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्याच्या भरवलिया गावात काल शनिवारी जमिनीच्या वादातून काही लोकांनी एका १९ वर्षीय तरुणीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला़

युवतीला जाळून मारण्याचा प्रयत्न
बस्ती : उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्याच्या भरवलिया गावात काल शनिवारी जमिनीच्या वादातून काही लोकांनी एका १९ वर्षीय तरुणीला जाळून मारण्याचा प्रयत्न केला़ पीडित तरुणी यात ४५ टक्के भाजली़ तिची प्रकृती सध्या धोक्याबाहेर आहे़ पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भरवलिया गावात एका दलित कुटुंबाच्या जमिनीवरील ताब्यावरून वाद सुरू आहे़ याच वादांतर्गत एका पक्षाने जमिनीवरील झाड कापण्याचे प्रयत्न केला. दुसर्या पक्षाने यास विरोध करताच पहिल्या पक्षाने त्यांच्यावर हल्ला चढवला़ (वृत्तसंस्था) या हल्ल्यात पीडितेच्या वडिलांना मारहाण करण्यात आली़ तिने मध्यस्थी करून आपल्या पित्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, तिच्या शरीरावर केरोसीन टाकून तिला पेटवून देण्यात आले़ तिच्या आईने प्रसंगावधान राखून कसेबसे तिला वाचविले़(वृत्तसंस्था)