शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
5
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
6
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
7
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
8
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
9
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
10
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
11
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
12
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
13
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
14
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
15
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
16
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
17
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
18
कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले...
19
अल-फलाहचे डॉक्टर ते 'जैश'चे ब्लास्ट इंजिनिअर! दिल्ली स्फोट प्रकरणातील 'डॉक्टर मॉड्यूल'चा पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देशावर संघाचा विचार लादण्याचा प्रयत्न

By admin | Updated: May 28, 2015 23:54 IST

मोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली.

शीलेश शर्मा - नवी दिल्लीमोदी सरकारवर चौफेर हल्ला चढवणारे काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपावरही कडाडून टीका केली. मोदी सरकारने देश संघाच्या हवाली केला आहे. देशावर संघाची विचारधारा लादण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला. देशात केवळ एकच व्यक्ती सर्वज्ञानी आहे. ही व्यक्ती स्वत:ला सर्व विषयातील जाणकार सांगून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे होता.एनएसयूआयच्या संमेलनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. आपल्या भाषणात राहुल यांनी मोदी सरकारवर मोजून-मापून हल्ले केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करण्याच्या पद्धतीवरही त्यांनी ताशेरे ओढले. पंतप्रधानांवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, पंतप्रधान चीन, जपान, अमेरिका, मंगोलिया फिरून आले. पण शेतकरी आणि मजुरांना भेटण्यासाठी त्यांच्याजवळ वेळ नाही. एकीकडे मोदी शिक्षण व्यवस्था बळकट करण्याची भाषा करतात. दुसरीकडे देशाचे भविष्य असलेल्या शिक्षण संस्थांमध्ये संघाची विचारधारा थोपण्याचे काम सुरू आहे. मोदींनी ‘मेक इन इंडिया’चा नारा दिला आहे. पण याचे परिणाम ‘शून्य’ येईल, हे मी आजच खात्रीपूर्वक सांगेल. कारण जनतेची भागीदारी गरजेची असताना मोदी सरकार केवळ निवडक उद्योगपतींना सोबत घेऊन हे काम करीतआहे. मोदी सरकारचे गत वर्षभरातील कामकाज याचा पुरावा आहे.४नरेंद्र मोदी व माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या बुधवारच्या भेटीचा हवाला देत, राहुल गांधी यांनी मोदी यांना जोरदार टोला लगावला. देशाच्या अर्थव्यवस्थेबाबत मनमोहनसिंग यांनी चिंता व्यक्त करताच, पंतप्रधान मोदी यांनी मनमोहनसिंगांना बोलावून घेत त्यांच्याकडून देशाची अर्थव्यवस्था कशी चालते याचे धडे घेतले, असे ते म्हणाले. ४संघाच्या शाखेत कुणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. रांगेत उभे राहून सांगितले ते निमूटपणे करणे, एवढेच शाखेत करावे लागते. शिस्तीच्या नावावर व्यक्तीस्वातंत्र्य संपविण्यावर संघाचा विश्वास आहे. हीच विचारधारा देशावर लादण्याचे प्रयत्न भाजप व मोदी सरकार करीत आहे. काँग्रेसची विचारसरणी मात्र वेगळी आहे. येथे सगळ्यांचा आवाज ऐकला जातो. कारण हे काँग्रेसच्या ‘डीएनए’मध्ये आहे. वेगवेगळी मते, विचारधारेचा काँग्रेस मेळ घालते. हीच काँग्रेसची शक्ती आहे. आम्ही अंतर्गत लोकशाही मानतो. याउलट संघ आणि भाजपा शिस्तीचा बडगा उभारून विचारस्वातंत्र्य नष्ट करते, असे राहुल म्हणाले.