शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

चहावाल्याची सच्चाई; व्यापाऱ्याचे 50 हजार हसतमुखाने परत केले, वर चहाही पाजला!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 12:27 PM

सोमवारी दुपारनंतर बर्रा येथील व्यापारी अभिषेक हे नयागंज येथील लाल फाटकस्थित बाजारात खेरदी करण्यासाठी गेले होते. लाल फाटकच्या बाहेर आपली स्कुटी उभी करुन ते आत शिरले.

कानपूर - येथील एका चहावाल्याच्या प्रामाणिकपणा पाहून एक व्यापारी गहिवरला. कारण, दिवसाला 300 रुपये कमावणाऱ्या या चहावाल्यास सापडलेले 50 हजार रुपये त्याने संबंधित व्यापाऱ्याला परत केले होते. रमेश कुमार असे या चहावाल्याचे नाव असून नायगंज येथील एका बाजारात ते चहाचे दुकान लावतात. विशेष म्हणजे 50 हजार रुपये दिल्यानंतर, आपल्याच दुकानातील चहा पाजून रमेश कुमार यांनी व्यापाऱ्याला निरोप दिला.  

सोमवारी दुपारनंतर बर्रा येथील व्यापारी अभिषेक हे नयागंज येथील लाल फाटकस्थित बाजारात खेरदी करण्यासाठी गेले होते. लाल फाटकच्या बाहेर आपली स्कुटी उभी करुन ते आत शिरले. त्यावेळी त्यांच्याजवळील 500 रुपयांच्या नोटांचा बंडल खाली पडला. ही बाब त्यांच्या लक्षातच आली नाही. शेजारीत चहाचं दुकान चालवणाऱ्या रमेश कुमार यांना हा नोटांचा बंडल मिळाला. रमेश कुमार यांनी तो बंडल आपल्याजवळच ठेऊन घेतला. दरम्यान, थोड्याच वेळात अभिषेक बदहवास रमेश कुमार यांच्या चहाच्या टपरीजवळ परतले. त्याजागी ते काहीतरी शोधत असल्याचे रमेश कुमार यांनी पाहिले. त्यामुळे, काय झाले ? असा प्रश्न रमेश कुमार यांनी अभिषेक यांना विचारला. पैसे हरवल्यामुळे निराश झालेल्या अभिषेक यांनी नाराजीच्या सुरातच 50 हजारांचा बंडल येथे पडला, खरेदी करण्यासाठी आलो होतो, असे सांगितले. त्यावर, रमेश कुमार यांनी प्रतिप्रश्न करत, किती रुपयांच्या आणि किती नोटा होत्या. रमेश यांच्या प्रश्नावर अभिषेक यांनी 500 रुपयांच्या नोटा होत्या, हे उत्तर देतात खात्री होताच रमेश कुमार यांनी 50 हजारांचा बंडल अभिषेक यांच्या हातात ठेवला. एकवेळ तर अभिषेक यांना विश्वासच बसला नाही, की त्यांना त्यांचे हरवलेले पैस परत मिळाले आहेत. त्यानंतर, अभिषेक यांनी आग्रह करत 1 हजार रुपयांचे बक्षीस रमेश कुमार यांना दिले. तर रमेश कुमार यांनीही 50 हजारांसह चहा पाजून अभिषेक यांना निरोप दिला. दरम्यान, दुसऱ्या दिवशी बाजारात ही वार्ता कळताच, बाजारातील व्यापाऱ्यांनी प्रामाणिकपणाबद्दल त्या चहावाल्याचा सत्कार केला. 

टॅग्स :Rupee Bankरुपी बँकMONEYपैसा