शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

...तर तुतिकोरीनसारखा भडका महाराष्ट्रातही उडू शकला असता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 14:18 IST

प्रकल्पाला विरोध करताना भडकलेल्या आंदोलनात आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू

तुतिकोरीन: तामिळनाडूमध्ये स्टरलाईट कॉपर प्लांटविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनात आतापर्यंत 13 जणांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 70 हून अधिक जण जखमी झाले आहेत. स्टरलाईट कॉपर प्लांटमधून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात स्थानिक रस्त्यावर आले. त्यामुळे तुतिकोरीनमध्ये मोठा हिंसाचार होऊन स्थिती हाताबाहेर गेली. मात्र तुतिकोरीनसारखाच भडका महाराष्ट्रातही उडाला असता. कारण हा प्रकल्प आधी कोकणात येणार होता. मात्र वेळीच विरोध केल्यानं हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. स्टरलाईट कॉपर प्लांटमधून होणाऱ्या प्रदूषणाविरोधात सध्या स्थानिक जनता रस्त्यावर उतरली आहे. मंगळवारी या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. तर काहीजण जखमी झाले. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणखी 4 जणांनी जीव गमावल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 13 वर पोहोचला. सध्या तुतिकोरीनमध्ये दिसत असलेली परिस्थिती कोकणातही दिसली असती. मात्र पर्यावरणाला धोका असल्यानं या प्रकल्पाला विरोध झाला. त्यामुळे निसर्गाचं नुकसान टळलं. तुतिकोरीनमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे वादात सापडलेला स्टरलाईटचा प्रकल्प याआधीही चर्चेत राहिला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रासह गुजरात आणि गोव्यात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न झाले. मात्र या तिन्ही राज्यांमधून या प्रकल्पाला विरोध झाल्यानं हा प्रकल्प तामिळनाडूला नेण्यात आला. तामिळनाडूमध्ये हा प्रकल्प आणताना त्याच्याशी संबंधित माहितीशी छेडछाड करण्यात आली, असल्याचा आरोपदेखील काही स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. प्रकल्पाचा आजूबाजूच्या परिसरावर होणारा परिणाम, याबद्दल कंपनीनं दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा गंभीर आरोप स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आला आहे.  

टॅग्स :tuticorinतुतिकोरीनkonkanकोकणMaharashtraमहाराष्ट्र