शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

समानतेचा विजय!, सबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशाचं तृप्ती देसाईंनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 17:11 IST

केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे.

ठळक मुद्देइतिहास ! शबरीमाला मंदिरात दोन महिलांना केला प्रवेश समानतेचा विजय - तृप्ती देसाईमंदिराचे द्वार खुले करण्यात आल्यानंतर दर्शन घेणार - तृप्ती देसाई

तिरुवनंतपुरम - केरळमधील सुप्रसिद्ध सबरीमाला मंदिरामध्ये दोन महिलांनी प्रवेश करुन इतिहास घडवला आहे. या घटनेचे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक आणि सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी स्वागत केले आहे. हा विजय समानतेचा असल्याची प्रतिक्रिया देसाई यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशासाठी परवानगी दिली होती. यानंतर, 16 नोव्हेंबर 2018 रोजी सबरीमाला मंदिरात प्रार्थना करण्यासाठी देसाई अन्य काही महिलांसहीत पोहोचल्या होत्या. मात्र कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी त्यांना कोची विमानतळावरच अडवले होते. 

(Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला)

(चार तृतीयपंथीयांनी घेतले शबरीमालात अय्यपांचे दर्शन)

भगवान अयप्पाच्या मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याच्या घटनेवर तृप्ती देसाई यांनी म्हटले की, ''आमच्या आंदोलनाचे एक मोठे यश आहे. हा समानतेचा विजय आहे. महिलांसाठी नवीन वर्षातील ही चांगली सुरुवात आहे. शिवाय, सबरीमाला मंदिरातील महिला प्रवेशाला विरोध करणाऱ्यांचे आंदोलन अपयशी ठरले आहे. अयप्पा मंदिरात प्रार्थना करण्यासाठी सर्व महिलांना प्रवेश दिला गेला पाहिजे. दरम्यान, काही पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे आपण 20 जानेवारीपूर्वी मंदिराचे दर्शन घेऊ शकणार नसल्याचंही देसाई यांनी सांगितले. 20 जानेवारीला मंदिराचे द्वार बंद करण्यात येणार आहे. मात्र मंदिर दर्शनासाठी पुन्हा खुले करण्यात आल्यानंतर तेथे जाणार असल्याचं देसाईंनी स्पष्ट केले. महिलांनी घडवला इतिहास दरम्यान, बुधवारी पहाटेच्या सुमारास दोन महिलांनी सबरीमाला मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. या महिलांनी काळे कपडे घातले होते आणि त्याचे चेहरादेखील झाकलेला होता.  कनकदुर्गा (वय 44 वर्ष) आणि बिंदू (वय 42 वर्ष) अशी या महिलांची नावं असल्याची माहिती समोर आली आहे. या महिला पोलिसांसोबत मंदिरात गेल्या होत्या. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती उघड करण्यात आली नव्हती, अशी माहिती या महिलांनी स्थानिक वृत्तवाहिनीसोबत संवाद साधताना दिली. तर दुसरीकडे या महिलांनी प्रवेश केल्यामुळे मंदिर समितीकडून मंदिरात शुद्धिकरण करण्यात आल्याची संतापजनक माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, या माहितीस दुजोरा देत मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनी सांगितले की, दोन महिला सबरीमाला मंदिरात दाखल झाल्या होत्या, ही बाब सत्य आहे. 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं ऐतिहासिक निर्णय देत सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना मंदिर प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली होती. मात्र,  या निर्णयानंतरही महिलांसाठी भगवान अयप्पा मंदिराचे द्वारे खुले करण्यात आलेले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अनेक हिंदू संघटनांनी एकत्र येत आंदोलनं केली होती. अद्यापही हा वाद संपुष्टात आलेला नाही.   

टॅग्स :Sabarimala Templeसबरीमाला मंदिरKeralaकेरळ