Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2019 10:00 AM2019-01-02T10:00:46+5:302019-01-02T10:04:50+5:30

शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याची माहिती आहे. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.

History took place, finally Two women entered in sabarimala temple of aayappa | Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला

Video: इतिहास घडला, अखेर शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला

Next

नवी दिल्ली - शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केल्याची माहिती आहे. केरळमधील शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येथे महिलांना प्रवेश देण्यात आला. आज सकाळी 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 2 महिलांनी मंदिरात प्रवेश करुन इतिहास रचला आहे. बिंदु आणि कनकदुर्गा अशी या दोन महिलांची नावे असल्याचे समजते. 

शबरीमाला येथील आय्यप्पा मंदिरात महिलांना सरसकट प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्यावरून निर्माण झालेला वाद अद्यापही सुरूच आहे. यावरुन तेथील स्थानिकांनी आणि मंदिरातील पुजाऱ्यांनी महिला प्रवेशाला विरोध केला आहे. मात्र, बुधवारी पहाटे 3.45 वाजता दोन महिलांना आयप्पा मंदिरात प्रवेश केला. मध्यरात्री मंदिराच्या पायऱ्या चढण्यास त्यांनी सुरुवात केली होती. त्यावेळी, या दोन महिलांसमवेत काही पोलीस गणवेशात होते, तर काही पोलीस कर्मचारी सिव्हील ड्रेसमध्ये सुरक्षा पुरवत होते. 



 

Web Title: History took place, finally Two women entered in sabarimala temple of aayappa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.