शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

जातधर्म,भावनिक प्रचारावर भर; भाजपचा हिंदू, तर समाजवादी पार्टीचा मुस्लीम मतांवर डोळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2022 10:40 IST

विधानसभा असो किंवा लोकसभा, सर्वाधिक मतदार संघ असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेशातील निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथे विजय मिळवण्यासाठी काहीही हातखंडे वापरावे लागले तरी ते वापरले जातात.

मनोज मुळ्ये -

अमरोह (उत्तर प्रदेश) : मोफत धान्य, मोफत वीज आणि विकासाची गंगा, यमुना आणण्याची वचने राजकीय पक्षांकडून दिली जात असली तरी खरा प्रचार मात्र जातधर्म आणि भावनिक मुद्द्यांवरच केला जात आहे. भाजपने हिंदू तर सपाने मुस्लीम मतदारांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. दलित समाजाची व्होटबँक बाळगलेल्या बसपाच्या मायावतींनीही आता मुस्लीम मतांसाठी नवी भूमिका घेतली आहे.विधानसभा असो किंवा लोकसभा, सर्वाधिक मतदार संघ असलेले राज्य म्हणून उत्तर प्रदेशातील निवडणुकांकडे सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असते. त्यामुळेच येथे विजय मिळवण्यासाठी काहीही हातखंडे वापरावे लागले तरी ते वापरले जातात. म्हणूनच निवडणुकीआधी भाजपचे काही जण सपामध्ये तर सपाचे काही जण भाजपमध्ये गेले. उमेदवारांचे हे आदानप्रदान सत्तासुंंदरीसाठी होत आहे, हे स्पष्टच आहे.

उत्तर प्रदेशातील लोक हे मेंदूपेक्षा हृदयाने अधिक विचार करतात. म्हणूनच येथे भावनिक मुद्दे अधिक हाताळले जातात. आताच्या प्रचारातही राम मंदिराचा मुद्दा वापरला जात आहे. आता मंदिर उभारणीस सुरुवात झाल्यानंतरही हा मुद्दा घेत भावनिकतेला हात घातला जात आहे. भाजपकडून हिंदुत्वाची भूमिका नेहमीच ठळकपणे मांडली जाते. त्यामुळे भाजपच्या गाठीशी ही मते आहेत. त्याचवेळी भाजप हा मुस्लीमविरोधी आहे, असा प्रचार सपा आणि इतर पक्षांकडूनही केला जात आहे. भाजपने सत्तेत राहून घेतलेले बहुसंख्य निर्णय ठराविक वर्गासाठीच घेतले असल्याचा आक्षेप आहे.जातीयतेवर आधारित राजकारणालाही येथे बरेच महत्त्व आहे. शेतकरी आंदोलनामुळे नाराज असलेला जाट समाज यावेळी भाजपच्या बाजूने उभा राहणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. 

मायावतीही नाहीत मागे - -    या लढाईत मायावतीही मागे नाहीत. अमरोह येथे चार दिवसांपूर्वी आपल्या जाहीर सभेत मायावती यांनी दलित समाजासह मुस्लीम समाजालाही आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला. -    दलित समाजातील महापुरुषांच्या नावाने राबववल्या जाणाऱ्या योजना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सीएए विधेयकादरम्यान झालेल्या आंदोलनात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, ते सत्ता मिळाली तर पूर्णपणे रद्द करण्याची भूमिका मांडत त्यांनी मुस्लीम समाजालाही आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२BJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीHinduहिंदूMuslimमुस्लीम