ट्रकचालकाला लुटणारा अटकेत
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:15+5:302015-02-14T23:52:15+5:30
पुणे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडी सुनावली आहे.

ट्रकचालकाला लुटणारा अटकेत
प णे : मुंबई-बेंगलोर महामार्गावर पुनावळे येथे रात्रीच्या वेळी ट्रक उभी करून ट्रकचालक झोपला असता, त्याला सुरीचा धाक दाखवून ११ हजारांच्या रोकड व मोबाइल हिसकावून नेणार्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना १६ फेब्रुवारीपयंर्त पोलीस कोठडी सुनावली आहे. कमलाकांत ऊर्फ राजू सोमनाथ नांगडे (वय २१, रा. शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. भुवनेश्वर, उडिसा) आणि ज्ञानेश्वर ऊर्फ माउली विठ्ठल ढवल (वय २०, रा. शिंदे वस्ती, रावेत, मूळ रा. बीड) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ट्रकचालक सुधाकर वसंत ढगे (वय ३६, रा. जिजामाता कॉलनी, अभय नगर, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. ढगे यांनी त्यांच्या ट्रकमध्ये ६ फेब्रुवारीला अहमदाबाद येथील रेणुका ट्रान्सपोर्ट या ठिकाणावरून पार्सल माल भरला आणि हुबळी, कर्नाटक येथे घेऊन जाण्यासाठी ते मुंबई-बेंगलोर या मागार्ने प्रवास करत होते. ८ फेब्रुवारी रोजी (रविवारी) रात्री त्यांनी मुंबई-बेंगलोर महामार्गावरील पुनावळे गावच्या हद्दीत ताज हॉटेलशेजारी ट्रक उभी केली आणि ट्रकचे दोन्ही दरवाजे आतून लावून घेऊन झोपले होते. रात्री सव्वातीनच्या सुमारास त्यांच्या ट्रकचा दरवाजा आरोपींनी वाजवला. आरोपी हे त्यांच्या ट्रकच्या केबिनमध्ये शिरले आणि त्यांनी चालक ढगे यांना सुरीचा धाक दाखवून साडेअकरा हजार रुपये आणि मोबाइल जबरदस्तीने घेऊन त्यांच्या दुचाकीवरून फरार झाले. आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांच्याकडून रोख रक्कम हस्तगत करण्यासाठी व गुन्ात आणखी कोणी साथीदार आहेत का, याचा तपास करण्यासाठी सरकारी वकील ए. के. पाचारणे यांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.