्रजयंती मिरवणुकीत ट्रक घुसला मुलगी ठार; तीन जखमी
By admin | Updated: April 15, 2015 00:45 IST
जळगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ट्रक घुसल्याने रुचिता दिलीप साबळे (रा.सुप्रीम कॉलनी) ही १४ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली तर तीन जण जखमी झाले.
्रजयंती मिरवणुकीत ट्रक घुसला मुलगी ठार; तीन जखमी
जळगाव- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मंगळवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास ट्रक घुसल्याने रुचिता दिलीप साबळे (रा.सुप्रीम कॉलनी) ही १४ वर्षांची मुलगी जागीच ठार झाली तर तीन जण जखमी झाले.ही घटना शहरातील अत्यंत वर्दळीच्या शास्त्री टॉवर चौकात घडली. जखमींपैकी निकिता सहदेव गवई (वय १५, रा. सुप्रीम कॉलनी), गोकर्णाबाई तुळशीराम सपके (५०, रा.सुप्रीम कॉलनी) आणि कोकिळाबाई तायडे (३५, रा.रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.