ट्रकचा फाळका छातीवर पडून कामगार ठार

By Admin | Updated: August 13, 2015 22:34 IST2015-08-13T22:34:35+5:302015-08-13T22:34:35+5:30

पुणे : ट्रकचा फाळका छातीवर पडून गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना 18 जुलै कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक आठमध्ये रोजी घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

The truck collapses on the chest and killed workers | ट्रकचा फाळका छातीवर पडून कामगार ठार

ट्रकचा फाळका छातीवर पडून कामगार ठार

णे : ट्रकचा फाळका छातीवर पडून गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मृत्यू झाल्याची घटना 18 जुलै कोरेगाव पार्क येथील लेन क्रमांक आठमध्ये रोजी घडली होती. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे.
गोकुळ तुळशीराम शिंदे (वय 34, रा. पारवा रोड, धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष अहिरे (वय 67, रा. आंबेडकरनगर, धुळे) यांनी फिर्याद दिली आहे. अयुब सपडु शेख असे अपघातात मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे. शेख ट्रकचा फाळका लावण्याचे काम करीत होता. त्यावेळी शिंदे याने अचानक ट्रक पाठीमागे घ्यायला सुरुवात केली. त्यावेळी पाठीमागचा निसटलेला फाळका शेखच्या छातीवर पडला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
---------
बिनतारीच्या मुख्यालयातून चंदनाचे झाड चोरीला
पुणे : बिनतारी संदेश यंत्रणेच्या मुख्यालयातील पोलीस निरीक्षकाच्या बंगल्याच्या कंपाऊंडमधील 500 रुपयांचे चंदनाचे झाड अज्ञात चोरट्यांनी कापून नेले. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक शैलेश चव्हाण (वय 49, रा. चव्हाणनगर, पाषाण) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री पाषाण रस्त्यावरच्या शिवनेरी बंगल्याच्या आवारात घडली होती. पुढील तपास उपनिरीक्षक डी. डी. कारंडे करीत आहेत.
---------

Web Title: The truck collapses on the chest and killed workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.