छेडछाड ही गंभीर समस्या
By Admin | Updated: March 3, 2016 01:57 IST2016-03-03T01:57:10+5:302016-03-03T01:57:10+5:30

छेडछाड ही गंभीर समस्या
>मलाही सांगायचंय - नारायणगाव विद्येचे माहेर घर म्हणून ओळखले जाते. हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात़ नारायणगाव येथील कॉलेजचा चांगला लौकिक आहे़ परंतु कॉलेजमध्ये शिक्षणानिमित्त येणार्या विद्यार्थिनींची छेडछाड ही गंभीर समस्या आहे़ महाविद्यालयीन विद्यार्थिनींना ये-जा करताना त्यांची रोडरोमिओंकडून होणारी छेडछाड, कमेंट्स या बाबी गंभीर होत चालल्या आहेत़ या गोष्टींना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने गंाभीर्याने लक्ष दिले पाहिजे. जी मुले छेडछाड करतात त्यांना वचक बसविण्यासाठी त्यांचेवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कॉलेजच्या वेळेत पोलिसांची गस्त कायमस्वरूपी ठेवली पाहिजे़ महिला पोलीसदेखील त्या भागात गस्त घालतील, अशा प्रकारचे नियोजन केले पाहिजे़ पोलिसांनी कॉलेज रोडवर पोलीस मदत केंद्र उभारले, तर आणखीन चांगले होईल़ स्थानिक ग्रामस्थांनीदेखील रोडरोमिओंची माहिती पोलिसांना कळविली पाहिजे़ सर्वांनी जागरूकता दाखविली, तरच छेडछाडचे गैरप्रकार थांबतील़ प्रमोद बारहाते, नारायणगाव