तळोद्यात तणाव; संचारबंदी शिथिल
By Admin | Updated: August 16, 2015 23:44 IST2015-08-16T23:44:29+5:302015-08-16T23:44:29+5:30
तळोदा (जि. नंदुरबार) : शनिवारी रात्री येथे उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. रविवारी संध्याकाळी संचारबंदी शिथिल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

तळोद्यात तणाव; संचारबंदी शिथिल
त ोदा (जि. नंदुरबार) : शनिवारी रात्री येथे उसळलेल्या दंगलीनंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे. रविवारी संध्याकाळी संचारबंदी शिथिल करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही गटांच्या दीडशे ते दोनशे जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी १६ जणांना अटक केली आहे. विद्यार्थीनीच्या छेडछाडीच्या वादातून शनिवारी सायंकाळी दंगल उसळली होती. दोन्ही गटांतील जमावाने दगडफेक करत वाहनांचे, घरांचे नुकसान केले. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांवरही दगडफेक झाली. त्यात तीन पोलीस अधिकार्यांसह नऊ जण जखमी झाले. तणाव लक्षात घेऊन रविवारी सकाळी सात वाजेपासून लागू केलेली संचारबंदी चारनंतर शिथिल करण्यात आली. जिल्हाधिकारी प्रदीप पी., आ. उदेसिंह पाडवी यांनी दंगलग्रस्त भागात भेट दिली. पोलीस अधीक्षक महेश घुर्ये, अपर अधीक्षक अनिता पाटील घटनास्थळी तळ ठोकून आहेत. (प्रतिनिधी)