शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली भाजपाच्या दारुण पराभवामागची त्रिसूत्री

By admin | Updated: February 11, 2015 06:29 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मिळालेला ऐतिहासिक विजय हा भाजपाचे सर्वांत मोठे रणनीतीकार मानले जाणारे पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पराभव आहे. पक्षासाठी सतत ४१ निवडणुका जिंकणाऱ्या शहा यांच्या रणनीतीत अशी कोणती चूक झाली की भाजपाला दिल्लीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला? यामागची काही प्रमुख प्राथमिक कारणे...> प्रचारात विकासाकडे दुर्लक्ष लोकसभेची निवडणूक आणि काही राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांप्रमाणेच भाजपा श्रेष्ठींनी दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही आक्रमक प्रचार मोहीम राबविली. पक्ष नेतृत्वाने अनेक दिग्गज नेत्यांसह पक्षाच्या १२० खासदारांची फौज प्रचारात उतरविली. सोशल मीडियासोबतच प्रिंट मीडियाचाही मोठ्या प्रमाणात वापर केला. वर्तमानपत्रात मोठमोठ्या जाहिराती देऊन केजरीवाल यांची थट्टा करण्याचा प्रयत्न केला. नकारात्मक प्रचार केला. त्यामुळे भाजपा लोकांना आपला विकासाचा अजेंडा समजावून सांगण्यात अपयशी ठरली. दिल्लीच्या सुशिक्षित व सभ्य लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात आले नाहीत. या लोकांनी भाजपाचा हा नकारात्मक प्रचार नाकारला.> मोदी लाटेचा फायदा नाही निवडणुका उशिरा जाहीर झाल्यामुळे प्रदेश भाजपाला मोदी लाटेचा फायदा करून घेण्यात अपयश आले. दिल्लीत उशिराने निवडणुका जाहीर करणे हा भाजपाच्या विशेष रणनीतीचा भाग होता, असे सांगितले जाते. रा.स्व. संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांना तयारी करण्याची पूर्ण संधी मिळावी हा त्यामागचा हेतू होता. परंतु स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा अभाव असल्याने कार्यकर्त्यांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला. शिवाय मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यातही विलंब झाला आणि शेवटी किरण बेदींचे नाव पुढे आल्याने भाजपात गटबाजी निर्माण झाली.> व्हिजन डॉक्युमेंट अपयशी भाजपाने आम आदमी पार्टीचे डावपेच हाणून पाडण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणी आपले डावपेच बदलले आणि निवडणूक जाहीरनामा देण्याऐवजी व्हिजन डॉक्युमेंट सादर केले. त्यात दिल्लीच्या विकासासाठी एक रोडमॅप सादर करण्यात आला. व्हिजन डॉक्युमेंट जारी करण्यात विलंब झाल्याने हे व्हिजन डॉक्युमेंट नेमके काय आहे, हे लोकांना समजावून सांगण्यासाठी वेळच मिळाला नाही. भाजपाने निवडणूक प्रचारादरम्यान आम आदमी पार्टीला दररोज पाच प्रश्न विचारले. हे प्रश्न फारसे प्रभावी नसल्याने आणि त्यात नकारात्मकताच असल्याने ते लोकांच्या गळी उतरले नाहीत.