शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

VIDEO: चल बाहेर निघ! लग्न लागत असताना पोलीस आले मंडपात; धक्के मारत काढली नवरदेवाची 'वरात'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 12:35 PM

जिल्हाधिकारी शैलेश कुमार यांच्या कारवाईचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

अगरताळा: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यानंतर अवघ्या अडीच आठवड्यांत हा आकडा ३ लाखांच्या पुढे गेला. गेल्या ६ दिवसांपासून देशात दररोज ३ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणं गरजेचं आहे. मात्र तरीही अनेक जण नियम मोडत आहेत. नियम धाब्यावर बसवून करण्यात येणाऱ्या एका लग्न सोहळ्यातील कारवाईचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानं त्रिपुरामध्ये सध्या नाईट कर्फ्यू लागू आहे. मात्र तरीही पश्चिम त्रिपुरा येथे एका ठिकाणी रात्री उशिरापर्यंत विवाह सोहळा सुरू होता. त्या ठिकाणी जाऊन जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी कारवाई केली. त्यावेळी त्यांनी अनेकांना हॉलबाहेर जाण्यास सांगितलं. तर नवरदेवाला थेट धक्के मारून बाहेर काढण्यात आलं. संतापलेल्या शैलेश कुमार यांनी हॉल सील करण्याचे आदेश दिले. व्हायरल व्हिडीओमध्ये शैलेश कुमार एका हॉलमध्ये जाऊन लग्न सोहळा थांबवताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांनी उपस्थितांना कठोर शब्दांत सुनावलं. यावेळी त्यांनी वापरलेल्या भाषेवर आता टीका होऊ लागली आहे. शैलेश यांनी नवरदेवाला धक्के मारून बाहेर काढलं. या प्रकरणी आपत्ती प्रतिबंधात्मक अधिनियमांच्या अंतर्गत अनेकांवर गुन्हे दाखल केले. त्यांनी ३० जणांना अटक केली. मात्र थोड्याच वेळात त्यांची सुटका झाली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या