शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाचा मुख्यमंत्रीच बांगलादेशी?; 37 वेळा एडिट झालं विकिपीडिया पेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 13:06 IST

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सवरुन भाजपाचा मुख्यमंत्री वादात

आगरतळा: मी भारतीय असून माझा जन्म भारतातच झाला आहे, असं त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लल कुमार देव यांनी म्हटलं आहे. विप्लव देव यांच्या जन्मस्थळावरुन सध्या वाद सुरू आहे. देव यांच्या विकिपीडिया पेजवर गेल्या तीन दिवसांमध्ये 37 वेळा बदल झाले आहेत. देव यांचा जन्म बांगलादेशमध्ये झाल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांच्या विकिपीडिया पेजवर सतत बदल केले जात आहेत. आसाममध्ये 30 जुलैला नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझनचा (एनआरसी) अंतिम मसुदा लागू करण्यात आला. यामध्ये राज्यातील तब्बल 40 लाख लोकांची नावं नाहीत. त्यामुळे आसाममध्ये नागरिकत्वचा वाद पेटला आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून विप्लव देव यांच्या विकिपीडिया पेजवरुनही वादंग माजला आहे. गुरुवार ते शनिवार या तीन दिवसांमध्ये त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या विप्लव देव यांचं विकिपीडिया पेज तब्बल 37 वेळा एडिट करण्यात आलं आहे. देव यांचं जन्मस्थान त्रिपुरातील गोमती जिल्ह्याऐवजी बांगलादेशच्या चांदपूर जिल्ह्यात असल्याची माहिती विकिपीडिया पेजवर दिली जात आहे. विप्लव देव यांच्या विकिपीडिया पेजवर पहिला बदल शनिवारी सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी करण्यात आला. देव यांचं जन्मस्थान चांदपूरच्या कछुआमधील राजधर नगर असल्याचा बदल करण्यात आला. यानंतर दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी त्यांचं जन्मस्थान राजधर नगरऐवजी त्रिपुरातील गोमती जिल्हा असं करण्यात आला. पुन्हा दुपारी 2 वाजून 37 मिनिटांनी त्यांचं जन्मस्थळ बदलून ते बांगलादेश करण्यात आलं. 'अवैधपणे भारतात स्थलांतर केल्यावर त्यांनी त्रिपुरातील शाळेत शिक्षण घेतलं,' अशी माहिती विकिपीडियावर देण्यात आली आहे. यानंतर पुन्हा संध्याकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी पेजवर बदल करण्यात आला आणि देव यांचा उल्लेख बांगलादेशी असा करण्यात आला. यानंतर शुक्रवारी आणि शनिवारीही त्यांच्या पेजवर अनेक बदल करण्यात आले.  

टॅग्स :AssamआसामChief Ministerमुख्यमंत्रीBangladeshबांगलादेशNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादी