शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

उन्माद! विजयानंतर त्रिपुरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लेनिनचा पुतळा बुलडोझरने पाडला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2018 8:55 AM

हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले.

आगरतळा: विधानसभा निवडणुकीत डाव्यांवर मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर सोमवारी त्रिपुरात भाजपच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. या कार्यकर्त्यांनी काल दुपारी डाव्यांचा आदर्श असणारा कम्युनिस्ट नेता लेनिन याचा बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागातील पुतळा बुलडोझरने पाडला. एवढेच नव्हे तर हा पुतळा पाडल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्याचे शीर वेगळे करून त्याला फुटबॉलसारखे लाथाडले. त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. यावेळी भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची 25 वर्षांची सत्ता उलथवून लावली. मात्र, या विजयाला 48 तास उलटत नाही तोच भाजपाच्या कार्यकर्त्यांचा विजयी उन्माद दिसून आला. 2013 मध्ये त्रिपुरात पुन्हा डाव्यांची सत्ता आल्यानंतर सरकारतर्फे बेलोनिया शहराच्या मध्यवर्ती भागात लेनिनचा पुतळा उभारण्यात आला होता. काल दुपारी 2.30 भाजपाचे काही कार्यकर्ते याठिकाणी जमले आणि त्यांनी बुलडोझरच्या सहाय्याने हा पुतळा पाडला. यावेळी त्यांच्याकडून 'भारत माता की जय' अशा घोषणाही देण्यात आल्या. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हा पुतळा खाली पाडल्यानंतर त्याचे शीर धडापासून वेगळे करण्यात आले. त्यानंतर भाजपाचे कार्यकर्ते लेनिनच्या शीराला बराचवेळ फुटबॉलसारखे लाथाडत होते. साहजिकच या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भाजपाला कम्युनिस्टांची प्रचंड भीती वाटत असल्यामुळे त्यांनी हे कृत्य केल्याची टीका मार्क्सवादी नेत्यांनी केली. तर हे कृत्य म्हणजे डाव्यांच्या दमनशाहीविरुद्ध असणारा लोकांचा रोष असल्याचे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे. आमच्या पक्षाकडून कोणताही बुलडोझर भाड्याने घेण्यात आला नव्हता. हा परिसर डाव्यांच्या कट्टर विरोधकांचा आहे. त्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून प्रत्येक आठवड्याला याठिकाणी सभा आणि कार्यक्रम घेऊन विरोधकांवर आपली विचासरणी थोपवण्याचा प्रयत्न केला जाई. याच रागातून स्थानिक लोकांनी लेनीनचा पुतळा पाडला, असे भाजपा नेते राजू नाथ यांनी म्हटले.  या घटनेनंतर बुलडोझरचा चालक आशिष पाल याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, संध्याकाळी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. तसेच पालिकेकडून या पुतळ्याचे अवशेष ताब्यात घेण्यात आले आहेत. यावरून आता राष्ट्रीय पातळीवर भाजपा आणि डाव्यांमधील लढाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत. 

टॅग्स :Tripura Election Results 2018त्रिपुरा निवडणूक निकाल 2018BJPभाजपाCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडिया