शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Triple Talaq: सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की तोडायची आहेत?- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 20:07 IST

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर सुप्रिया सुळेंचा सवाल

नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयकानं गुन्हेगारीकरणाला प्रोत्साहन मिळेल, अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवयाची आहेत की तोडायची आहेत?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तिहेरी तलाक दिल्यास पतीला थेट तुरुंगात टाकण्यात येईल. अशा परिस्थितीत तलाक देण्यात आलेली महिला काय खाणार, तिचा उदरनिर्वाह कसा चालणार, असे प्रश्न सुळे यांनी विचारले. लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं. सभागृहात उपस्थित असलेल्या २४५ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ११ सदस्यांनी विरोधात मत नोंदवलं. यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलताना सुप्रिया सुळेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. सरकारनं लोकसभेत विधेयक मंजूर केलं. पण राज्यसभेत सरकारला बहुमत नाही. इतकंच काय सध्या राज्यसभेचं कामकाज चालतही नाही. मग या विधेयकाचं रुपांतर कायद्यात कसं केलं जाणार?, असा प्रश्न सुळे यांनी उपस्थित केला.तिहेरी तलाकच्या माध्यमातून गुन्हेगारीकरणात वाढ होईल, असा दावादेखील त्यांनी केला. एखाद्या पतीनं त्याच्या पत्नीला तिहेरी तलाक दिल्यास तो गुन्हा ठरणार. त्यामुळे त्याची रवानगी थेट तुरुंगात केली जाणार. यानंतर त्या महिलेचं काय? तुरुंगात असलेला पती महिलेला भरपाई कशी काय देणार? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. पती तुरुंगात गेल्यावर त्या महिलेनं काय करायचं असं म्हणत सुळे यांनी सरकारला मुस्लिम महिलांची लग्न वाचवायची आहेत की मोडायची आहेत?, असा सवाल विचारला.  

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabhaलोकसभाBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस