शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर; काँग्रेसचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 19:40 IST

२४५ खासदारांचं विधेयकाच्या बाजूनं मतदान

नवी दिल्ली: तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या २४५ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं. तर ११ सदस्यांनी विरोधात मत नोंदवलं. या विधेयकात एमआयएमचे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी तीन सुधारणा सुचवल्या होत्या. मात्र या तिन्ही सुधारणा मंजूर होऊ शकल्या नाहीत. यासोबतच आणखी अनेक सुधारणादेखील मंजूर झाल्या नाहीत. आज लोकसभेत तिहेरी तलाक विधेयकावर वादळी चर्चा झाली. यासाठी भाजपा आणि काँग्रेसनं खासदारांना व्हीप जारी केला होता. काँग्रेस, तृणमूल काँग्रेससह अनेक पक्षांनी हे विधेयक संयुक्त निवड समितीकडे पाठवण्याची मागणी केली. या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर काँग्रेस, एमआयएडीएमकेच्या खासदारांना सभात्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या विधेयकावरील मतदानावेळी लोकसभेत २५६ खासदार होते. यातील २४५ खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला. त्यामुळे विधेयक बहुमतानं मंजूर झालं. काँग्रेस, एमआयएडीएमके, समाजवादी पक्षाचे खासदार मतदानात सहभाग झाले नव्हते. या विधेयकाविरोधात सुचवण्यात आलेली एकही सुधारणा मंजूर होऊ शकली नाही. याआधी डिसेंबर २०१७ मध्ये लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झालं होतं. मात्र हे विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. त्यानंतर सरकारला यासाठी अध्यादेश काढावा लागला होता. अध्यादेश काढल्यानंतर सरकारला सहा महिन्यांच्या कालावधीत विधेयक संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये मंजूर करावं लागतं. मात्र सरकारला सहा महिन्यात विधेयक मंजूर न करता न आल्यानं आज ते पुन्हा लोकसभेत मांडण्यात आलं. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाली असली, तरी राज्यसभेत ते मंजूर होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मोदी सरकारला राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे तिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत मंजूर करताना सरकारची कसोटी लागेल.

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसBJPभाजपा