शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

Triple Talaq Bill: 'रामानेही सीतेला सोडलं होतं, मग इस्लामलाच लक्ष्य का करता?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2018 11:38 IST

Triple Talaq Bill: तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

नवी दिल्लीः बहुचर्चित तिहेरी तलाकविरोधी विधेयकाचं राज्यसभेत काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी वेगळ्याच वादाला तोंड फोडलं आहे. 'सर्वच धर्मांमध्ये स्त्रियांना कमी-अधिक फरकाने अन्याय्य वागणूक दिली जाते. रामायणात श्रीरामानेही सीतेवर संशय घेऊन तिला सोडलं होतं. याचाच अर्थ, सर्व धर्मांमध्ये पुरुषांचं वर्चस्व पाहायला मिळतं. मग फक्त मुस्लिम धर्मातील रुढींवर बोट का ठेवलं जातंय?, असा प्रश्न हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला आहे. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे तिहेरी तलाकबाबतचं सुधारित विधेयक राज्यसभेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विधेयक मंजूर न झाल्यास या संदर्भात अध्यादेश काढण्याची तयारीही नरेंद्र मोदी सरकारने केल्याचं कळतं. या पार्श्वभूमीवरच, काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी या प्रकरणात प्रभू रामचंद्रांना ओढल्याने त्यावरून 'रामायण' होऊ शकतं.  

तिहेरी तलाक पद्धत गुन्ह्याच्या चौकटीत आणणारं 'मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' डिसेंबर महिन्यात लोकसभेत मंजूर झालं होतं. परंतु, या विधेयकातील काही तरतुदींवर विरोधकांनी आक्षेप घेतला होता. तिहेरी तलाक हा अजामीनपात्र गुन्हा असू नये, तलाक देणाऱ्या पतीला ३ वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद बदलावी, अशी मतं विरोधकांनी मांडली होती.  मोदी सरकारकडे राज्यसभेत बहुमत नसल्यानं हे विधेयक वरिष्ठ सभागृहात अडलं होतं. या अधिवेशनात हे विधेयक मंजूर करून घेण्याच्या दृष्टीने, सरकारने थोडी मवाळ भूमिका घेत काही तरतुदींमध्ये सुधारणा केली आहे.

मूळ विधेयकात तीन प्रमुख दुरुस्त्या प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, तिहेरी तलाक देणे हा गुन्हा अजामीनपात्र म्हणूनच कायम ठेवला असला, तरी योग्य प्रकरणात दंडाधिकारी आरोपीला जामीन देऊ शकतील. तसंच, पती आणि पत्नीमध्ये समेट झाल्यास दंडाधिकारी सुयोग्य अटींवर प्रकरण बंदही करू शकतील. त्याशिवाय, पत्नीने किंवा कुटुंबातील सदस्याने तक्रार नोंदवली तरच पोलीस गुन्ह्याची दखल घेणार आहेत. 

तिसऱ्या सुधारणेनुसार, महिलेला आपल्या मुलाचा ताबा आणि स्वतःसह मुलासाठी पोटगी मागण्याचा अधिकारही देण्यात आला आहे. हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाल्यास लोकसभेत परत पाठवलं जाईल आणि त्यातील सुधारणा संमत करून घेतल्या जातील. 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकRajya Sabhaराज्यसभाNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस