VIDEO- युपीमध्ये ट्रिपल मर्डर, घटना सीसीटीव्हीत कैद

By Admin | Updated: June 7, 2017 13:45 IST2017-06-07T13:26:54+5:302017-06-07T13:45:53+5:30

चोरीच्या उद्देशाने एका व्यापाऱ्यासह पत्नी आणि मुलाची हत्या करण्यात आली आहे.

Triple Murder in VIDEO-UP, CCTV-Captured incident | VIDEO- युपीमध्ये ट्रिपल मर्डर, घटना सीसीटीव्हीत कैद

VIDEO- युपीमध्ये ट्रिपल मर्डर, घटना सीसीटीव्हीत कैद

ऑनलाइन लोकमत

सीतापूर, दि. 7- चोरीच्या उद्देशाने एका व्यापाऱ्याची त्यांची पत्नी आणि मुलासह हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने आले असताना हा प्रकार घडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. सुनील जैसवाल हे धान्याचे व्यापारी शहरातील सिव्हील लाइन भागात पत्नी आणि मुलासह राहत होते. कामिनी जैसवाल आणि रितीक जैसवाल असं त्यांच्या पत्नी आणि मुलाचं नाव आहे. 
 
व्यापाऱ्याला लुटालया आलेल्या हल्लेखोरांनी आधी सुनील जैसवाल यांच्यावर हल्ला केला पण त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि मुलाने हत्सक्षेप केल्याने त्या दोघांनाही मारण्यात आलं, अशी माहिती पोलिस अधिकारी मृगेंद्र सिंह यांनी दिली आहे. गुन्हे शाखेकडून सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हल्लेखोरांना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. 
 
व्यापाऱ्याच्या हत्ये प्रकरणी व्यापारी संघटना आक्रमक झाली आहे. हल्लेखोरांना तात्काळ शोधून अटक करा नाहीतर आंदोलन करू, असा इशाला जिल्हा व्यापारी संघटनेनं दिला आहे.
 
 

Web Title: Triple Murder in VIDEO-UP, CCTV-Captured incident