त्रिपाठींच्या कारवाईने दारुभ˜ीवाल्यांची त्रेधातिरपीट

By Admin | Updated: August 23, 2015 20:40 IST2015-08-23T20:40:16+5:302015-08-23T20:40:16+5:30

बाळासाहेब काकडे : श्रीगोंदा

Tripathi's action against drupadi | त्रिपाठींच्या कारवाईने दारुभ˜ीवाल्यांची त्रेधातिरपीट

त्रिपाठींच्या कारवाईने दारुभ˜ीवाल्यांची त्रेधातिरपीट

ळासाहेब काकडे : श्रीगोंदा
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी श्रीगोंदा फॅक्टरीवरील गावठी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करण्याचा विडा उचलला आणि गुरुवारी सर्व दारुभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. सौरभ त्रिपाठींच्या धडाकेबाज कारवाईने दारुभट्ट्यावाल्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे.
ढोकराईच्या माळरानावर सन १९७२ च्या सुमारास सहकारी साखर कारखान्याचे धुराडे पेटले आणि दरम्यानच्या काळात घोड कालव्याच्या शेजारी काही महाभागांनी गावठी दारुच्या भट्ट्या पेटविल्या आणि धगधगत्या भट्ट्यातील जीवघेणे रसायनयुक्त सांडपाणी घोड कालव्यात सोडून देण्यात आले.
४० वर्षाच्या कालखंडात पोलिसांच्या अनेक पथकांनी दारुभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. अनेकांना अटक केली, परंतु पोलीस कारवाई झाल्यानंतर दुसर्‍या-तिसर्‍या दिवशीच दारुभट्ट्या सुरू झाल्या. त्यामुळे पोलिसांनी हात टेकले.
पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी यांनी हजर झाल्यानंतर दुसर्‍याच दिवशी या जीवघेण्या दारुभट्ट्यांवर छापा टाकून सुमारे अडीच लाखाचा दारुसाठा नष्ट केला, परंतु पोलीस श्रीगोंद्यात पोहचताच मागे पुन्हा दारुच्या भट्ट्या पेटल्या.
जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी यांनी दारुभट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी धडक मोहिमेचे स्वत: नेतृत्व केले. सुमारे साडेचार लाखाची गावठी दारू, रसायन व मोटारसायकली जप्त केल्या. १४ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवून ३ जणांना बेड्या ठोकल्या. जिल्हा पोलीसप्रमुखांनी प्रथमच कारवाई केल्याने पोलिसांची झोप उडाली आहे. बंद केलेल्या दारुभट्ट्या पुन्हा सुरू न होऊ देण्यासाठी जबाबदारी वाढली आहे.

पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी
जिल्हा पोलीसप्रमुख सौरभ त्रिपाठी व त्यांच्या सहकार्‍यांनी श्रीगोंदा कारखान्यावरील गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला आहे आणि ही चांगली कामगिरी आहे. अवैध धंदे बंद करण्यासाठी समाजानेही पोलिसांना मदत करण्याची गरज आहे.
-जयश्री औटी, अध्यक्षा, श्रीगोंदा तालुका दारुबंदी संघटना.

Web Title: Tripathi's action against drupadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.