शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

'विरोधकांना टार्गेट केलं जातंय'; महुआ मोईत्रा गंभीर यांचा आरोप; लोकसभा अध्यक्षांना लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 16:23 IST

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

नवी दिल्ली: कॅश फॉर क्वेरी प्रकरणात सापडलेल्या तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकार आपला फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. महुआ यांनी सांगितले की, मला Apple कडून अलर्ट आणि ईमेल मिळाला की सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महुआ मोईत्रा यांनी केला आहे. 

सदर प्रकरणावर आता महुआ मोईत्र यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. सध्याच्या भाजपा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्याला टार्गेट केले जात आहे. त्यांनी केंद्राचे वर्णन 'पीपिंग टॉम सरकार' असे केले, म्हणजे हे सरकार सर्वत्र डोकावते. महुआ यांनी लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत विरोधी खासदार आणि विरोधकांना लक्ष्य केले जात आहे. त्यासाठी केंद्रीय यंत्रणांचाही वापर केला जात आहे. दळणवळणाच्या साधनांमध्ये बनावट पुरावे पेरले जात असून, राजकीय स्वार्थ साधण्यासाठी निरपराध नागरिकांना गोवले जात असल्याचे महुआ मोईत्रा यांनी म्हटलं आहे.

टीएमसी खासदार महुआ मोईत्रा व्यतिरिक्त, काँग्रेस खासदार शशी थरूर, पवन खेडा आणि शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही त्यांच्या फोनवर अशा अलर्टचे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. हा इशारा आप खासदार राघव चढ्ढा, सपा अध्यक्ष अखिलेश यादव, सीपीएम सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्या फोनवरही आला आहे. दुसरीकडे, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही त्यांच्या फोनवर अलर्ट मिळाल्याचा दावा केला आहे.

नेमकं काय प्रकरण आहे?

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी एका व्यावसायिकाकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. महुआ मोइत्रा यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली होती. यानंतर ओम बिर्ला यांनी हे प्रकरण संसदेच्या एथिक्स कमिटीकडे पाठवले होते. जय अनंत देहाद्राई यांच्याकडून मिळालेल्या पत्राचा हवाला देत निशिकांत यांनी मोईत्रा यांच्यावर हे आरोप केले आहेत. 

निशिकांत दुबे यांचा दावा आहे की, महुआ मोइत्रा यांनी नुकत्याच लोकसभेत विचारलेल्या ६१ प्रश्नांपैकी ५० प्रश्न अदानी प्रकरणावर केंद्रित होते. त्याचवेळी मोईत्रा यांनी या संपूर्ण वादासाठी निशिकांत दुबे आणि त्यांचा मित्र जय अनंत यांना जबाबदार धरले. १७ ऑक्टोबर रोजी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आरोप केले की, त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्यासाठी हे आरोप करण्यात आले आहेत. महुआ मोइत्रा यांच्या याचिकेत न्यायालयाने दुबे, देहाद्राई आणि अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मीडिया हाऊसना त्यांच्या विरोधात कोणतीही खोटी आणि बदनामीकारक माहिती पोस्ट, प्रसारित करण्यापासून रोखण्यासाठी निर्देश जारी करावेत अशी मागणी केली आहे. मात्र महुआ यांच्या वकिलांनी या खटल्यातून माघार घेतली.  

टॅग्स :Trinamool Congressतृणमूल काँग्रेसlok sabhaलोकसभा