त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य

By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:27+5:302015-03-06T23:07:27+5:30

नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्ल्िंाग मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुले, पाने घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणार्‍या भाविकांच्या गर्दीवर होऊ लागल्याने या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी होणार्‍या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होणे शक्य आहे.

In Trimbakesh temple, the question of worship material is displeasing in the devotees on the anvil: discussions can be discussed at a trusted meeting | त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य

त्र्यंबक मंदिरात पूजा साहित्याचा प्रश्न ऐरणीवर भाविकांमध्ये नाराजी : विश्वस्त बैठकीत चर्चा शक्य

शिक : त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्ल्िंाग मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव फुले, पाने घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र स्वरूपाची नाराजी व्यक्त केली जात असून, त्याचा परिणाम मंदिरात दर्शनासाठी येऊ पाहणार्‍या भाविकांच्या गर्दीवर होऊ लागल्याने या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी होणार्‍या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चा होणे शक्य आहे.
रविवारी दुपारी श्री त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळाची मासिक बैठक बोलविण्यात आली असून, या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेबाबत निर्णय घेणे व बाहेरील भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात प्रवेशाबाबत निर्णय घेण्याचा विषय विश्वस्तांसमोर ठेवण्यात येणार आहे. मुळातच जानेवारी महिन्यात झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंदिराच्या सुरक्षेचा विषय घेऊन भाविकांना गर्भगृहात फुले, पाने व पूजेचे साहित्य नेण्यास बंदी घालण्यात आली, त्यावेळी मंदिर सुरक्षेसाठी स्कॅनिंग मशीन, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या प्रत्येक भाविकाची संपूर्ण माहिती जमा करण्याची व्यवस्था केली जावी, अशी मागणी काही विश्वस्तांनी केली होती, परंतु त्यावर फारशी कार्यवाही झालेली नाही. मात्र भाविकांना मंदिरात फुले नेण्यावर लादलेल्या बंदीमुळे मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे. देशातील कोणत्याही देवस्थानात पूजेचे साहित्य नेण्यास मज्जाव नसल्याचे सांगत विश्वस्त मंडळातील श्रीमती ललिता शिंदे यांनी या संदर्भात विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून या निर्णयाचा फेर विचार करण्याची मागणी केली आहे. रविवारी होणार्‍या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी करून परमेश्वराला पूजेचे साहित्य अर्पण करणे हा श्रद्धेचा व धर्माचा प्रश्न असल्याने ते मंदिराच्या सभामंडपापर्यंत नेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. सुरक्षेच्या नावाखाली भाविकांवर अनेक निर्बंध लादल्यास त्याचा परिणाम त्यांच्या गर्दीवर होण्याची शक्यता असून, तसे झाल्यास संपूर्ण शहरालाच त्याचा फटका बसणार असल्याचे श्रीमती शिंदे यांनी सांगितले.

Web Title: In Trimbakesh temple, the question of worship material is displeasing in the devotees on the anvil: discussions can be discussed at a trusted meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.