शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

चीनी अ‍ॅप Tiktok च्या प्रोफाईलमध्ये झळकला तिरंगा, भारतीयांनी चांगलंच सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2020 12:22 IST

भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई - सोशल मीडियावरील प्रसिद्ध चायना अ‍ॅप टीकटॉकने आपल्या प्राफाईल पिक्चरमध्ये शनिवारी सायंकाळी भारतीय तिरंगा ध्वजाचे छायाचित्र घेतले आहे. त्यानंतर, युजर्संने टीकटॉक अ‍ॅपबद्दल तीव्र संताप व्यक्त करत कमेंटच्या माध्यमातून कंपनीला चांगलंच सुनावलंय. अ‍ॅपबद्दल भारतीय युजर्संची नाराजी लक्षात घेऊन कंपनीने असं केलं होतं. मात्र, प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा झळकल्याने भारतीययुजर्सं आणखी नाराज झाले आहेत. 

भारत आणि चीन सीमारेषेवर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने आणि गलवान खोऱ्यात 20 भारतीय जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर देशातील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच, देशभरातून चीनी मालावर बहिष्कार घाला, अशी मोहिमही विविध संघटनांकडून राबविण्यात आली. चीनी सामानावर बहिष्कार या हेतुनेच चायना मोबाईल आणि चीनी अॅपही अनइन्सटॉल करुन भारतीयांनी चीनी कंपन्यांना दणका दिला. 

शनिवारी सायंकाळी टीकटॉकने आपल्या अॅपच्या प्रोफाईलमध्ये तिरंगा ध्वज झळकावला, त्यानंतर सोशल मीडियातून अनेक युजर्संने नाराजी व्यक्त करत कंपनीला खडेबोल सुनावले. या प्रोफाईल फोटोच्या कमेंटमध्ये युजर्संने RIP लिहून संताप, राग आल्याच्या इमोजीही दर्शवल्या आहेत. भारत आणि चीनच्या सीमारेषेवरील तणावाचा फटका भारतात असलेल्या चीनी कंपन्यांना बसला आहे. देशात चायना मालाची विक्री करणाऱ्या चायनीज कंपनींच्या बिझनेसचे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय नागरिकानी चीनी अॅप्स मोबाईलमधून अनइन्स्टॉल केले आहे. टीकटॉक, Helo, Likee आणि PUBG यांसारखे अॅप्सही मोठ्या प्रमाणात अनइन्स्टॉल झाले आहेत. त्यामुळे या कंपनींच्या जाहिरात बिझनेवर परिणाम झाला आहे. 

सेन्सॉर टाऊनच्या अहवालानुसार, लाईव्ह स्ट्रीमिंग अॅप्स, शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप लाईकी आणि गेमिंग अॅप PUBG च्या डाऊनलोडमध्ये जुन महिन्यात मोठी घट झाल्याचे दिसून आले. तर, टिकटॉक आणि हेलो अॅपच्या डाउनलोडमध्ये एप्रिल महिन्यांपासूनच घट झाली आहे.  

टॅग्स :Tik Tok Appटिक-टॉकchinaचीनSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर