दुचाकीचा कट लागल्यावरुन हाणामारी

By Admin | Updated: April 27, 2016 00:14 IST2016-04-27T00:14:49+5:302016-04-27T00:14:49+5:30

जळगाव: दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री दहा वाजता अजिंठा चौकात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे प्रचंड गर्दी झाली होती, दहा ते बारा जण चाल करुन आल्यामुळे पळापळ झाली होती. यात एक तरुण जखमी झाला. दोन जण दुचाकीवरुन जात असताना ट्रॅव्हल्स थांबण्याच्या ठिकाणी त्यांना एकाचा कट लागला. त्यामुळे सुरुवातील दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. एका दुचाकीचालकाचे अजिंठा चौफुलीवरच दुकान असल्याने त्याने दहा ते बारा जणांना बोलावून घेत त्या तरुणाला बदडून काढले. त्यामुळे प्रचंड गर्दी व पळापळ झाली. हा प्रकार समजल्यानंतर चौकातील एका पोलीस कर्मचार्‍याने एमआयडीसी पोलीस स्टेशनवरुन अतिरिक्त कर्मचारी मागवले, परंतु ते येण्याच्या आत हाणामारी करणारे पसार झाले.

A trickle from a bicycle cut | दुचाकीचा कट लागल्यावरुन हाणामारी

दुचाकीचा कट लागल्यावरुन हाणामारी

गाव: दुचाकीचा कट लागल्याच्या कारणावरुन मंगळवारी रात्री दहा वाजता अजिंठा चौकात दोन जणांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेमुळे प्रचंड गर्दी झाली होती, दहा ते बारा जण चाल करुन आल्यामुळे पळापळ झाली होती. यात एक तरुण जखमी झाला. दोन जण दुचाकीवरुन जात असताना ट्रॅव्हल्स थांबण्याच्या ठिकाणी त्यांना एकाचा कट लागला. त्यामुळे सुरुवातील दोघांमध्ये शाब्दीक वाद झाला. एका दुचाकीचालकाचे अजिंठा चौफुलीवरच दुकान असल्याने त्याने दहा ते बारा जणांना बोलावून घेत त्या तरुणाला बदडून काढले. त्यामुळे प्रचंड गर्दी व पळापळ झाली. हा प्रकार समजल्यानंतर चौकातील एका पोलीस कर्मचार्‍याने एमआयडीसी पोलीस स्टेशनवरुन अतिरिक्त कर्मचारी मागवले, परंतु ते येण्याच्या आत हाणामारी करणारे पसार झाले.

Web Title: A trickle from a bicycle cut