शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

'मै ठाकूर हूँ' म्हणणाऱ्या महिला बँक कर्मचाऱ्याची मांडली स्वत:ची बाजू; प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 17:08 IST

Aastha Singh hdfc bank viral video: जातीचा उल्लेख का करावा लागला, याबद्दलही दिली माहिती

Aastha Singh hdfc bank viral video: गेले दोन दिवस कानपूरच्या पनकी सेक्टर-२ मधील एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून कार्यरत असलेल्या आस्था सिंहचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती एका ग्राहकाशी उद्धटपणे वागत असल्याचे दिसत होते. मात्र, आता आस्थाने या प्रकरणातील आपली बाजू स्पष्ट केली असून त्यामुळे प्रकरणात नवा ट्विस्ट आल्याचे दिसते आहे. हा व्हिडिओ संदर्भाशिवाय (Out of context) आणि तिला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक अर्धाच व्हायरल करण्यात आल्याचा तिचा आरोप आहे.

तो व्यक्ती 'ग्राहक' नव्हता...

आस्थाच्या दाव्यानुसार, ही घटना ६ जानेवारीची आहे, परंतु रितू त्रिपाठीचे बँकेतील सर्व पैसे मिळाल्यानंतर जाणीवपूर्वक फेब्रुवारीमध्ये हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला, जेणेकरून आस्थाची प्रतिमा खराब करता येईल. आस्थाने सांगितले की ज्या व्यक्तीशी तिचा वाद झाला, तो कोणताही सामान्य ग्राहक नसून बँकेची माजी कर्मचारी रितू त्रिपाठी हिचा पती ऋषी त्रिपाठी होता. रितूने राजीनामा दिला होता आणि ती औपचारिकता पूर्ण करण्यासाठी बँकेत आली होती. आस्थाच्या म्हणण्यानुसार, त्या दिवशी सकाळी रितू त्रिपाठीच्या नणंदेसोबत तिचा बाथरुमच्या गेटजवळ किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर राग काढण्यासाठी ऋषी त्रिपाठी संध्याकाळी बँकेत आला आणि त्याने आस्थाशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

जातीचा उल्लेख केला...

व्हायरल व्हिडिओमध्ये आस्था 'मी ठाकूर आहे' असे म्हणताना दिसते. यावर तिने स्पष्टीकरण दिले की, ऋषीने तिच्या डेस्कवर येऊन तिची जात विचारली होती आणि तिला धमकावले होते की, "तू कोणत्या जातीची आहेस जी इतकी मस्ती दाखवत आहेस? मी तुझी सर्व मस्ती उतरवीन." या चिथावणीखोर विधानाला उत्तर देताना तिने आपल्या जातीचा उल्लेख केला होता.

'डिजिटल लिंचिंग'चा प्रकार

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आस्थाला सोशल मीडियावर अत्यंत खालच्या पातळीवर ट्रोल केले जाऊ लागले. तिला बलात्काराच्या धमक्या मिळत असून तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जात असल्याचेही तिने सांगितले. आस्थाने या प्रकरणाची माहिती आधीच बँक व्यवस्थापनाला ईमेलद्वारे दिली आहे. तसेच, व्हिडिओ अर्धा कापून व्हायरल केल्याबद्दल आणि तिची बदनामी केल्याबद्दल ती ऋषी त्रिपाठी आणि व्हिडिओ शेअर करणाऱ्यांविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Bank employee clarifies 'Thakur' remark in viral video; a new twist.

Web Summary : HDFC bank employee Aastha Singh, facing backlash for a viral video, claims the clip was deliberately edited to defame her. She alleges the incident involved a former employee's husband who provoked her with casteist slurs, leading to her controversial statement. She is planning legal action for defamation.
टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलViral Videoव्हायरल व्हिडिओSocial Mediaसोशल मीडियाhdfc bankएचडीएफसी